महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीने आपले कार्य सुरू केले आहे. तिलारी घाटात अपघात झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारला एक पत्र पाठविले होते. त्याची पत्राची दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना उत्तर देण्यात आले असून त्यांच्या विनंतीच्या काही सूचनाही मान्य केल्या आहेत.
युवा समितीच्या चे सायबर सेल साईनाथ शिरोडकर याने तिलारी अपघाता नंतर महाराष्ट्र शासनाशी पत्र व्यवहार केला होता त्याचे उत्तरही देण्यात आले आहे. बेळगाव येथील 5 युवक कारमधून तिलारी घाटात पर्यटनस्थळ पाहण्यासाठी गेले होते. तिथे त्यांच्यावर दुर्दैवी अपघात घडला. याला कारण म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या जागी संरक्षण भिंती नाहीत किंवा फलक नाहीत, असे आपल्या पत्रात म्हटले होते. या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करून देऊन पर्यंटकांची सोय करावी, अशी विनंती करण्यात आली होती. याची दखल घेऊन त्यांना उत्तर पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने पाठविलेल्या पत्रात तिलारी हा घाट 7.20 की मी चा आहे. दरीकडील बाजूला ढासळलेल्या ठिकाणी भिंत बांधणे, सूचना फलक लावणे आदी कामे करण्यासाठी 225.00 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्याच्या निविदाही काढण्यात आल्या असून त्या कामाला लवकरच चालना देण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. या पत्रामुळे युवा समिती आपले कार्य यापुढे वेगाने सुरू ठेवणारा असल्याचे दिसून येत आहे.
आता समितीला समिती नेत्यांनी जवळ करून धुराही द्यावी अशी मागणी केली जात आहे.अलीकडेच माजी आमदार संभाजी पाटील यांनी समितीच्या जेष्ठ नेत्यांनी युवकांना नेतृत्व द्या अशी मागणी केली होती त्यातच युवा समितीने आपली कार्यकारिणी जाहीर करून जोमाने कामास सुरुवात केली आहे. समिती नेत्यांना युवा समिती ला विश्वासात घ्यावे लागणार आहे.