दुर्गामाता दौडीचा आज दुसरा दिवस श्री गणेश मंदिर चननमा चौक येथे आमदार अनिल बेनके आणि प्रताप जाधव यांच्या हस्ते आरती करून ध्वज चढवण्यात आला खडक गल्ली, चव्हाट गल्ली, शिवाजी नगर , गांधी नगर येथे निघालेल्या दौडीत हजारोंच्या संख्येत शिवप्रेमी सहभागी झाले होते.
किल्ला येथे महार बटालियनच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. दौडीच्या मार्ग मध्ये आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या भगवे फेटे परिधान करून तरुण तरुणी दौडी मध्ये सहभागी झाले होते. यंदा शाळा परीक्षा लवकर संपल्याने बाळ गोपाळांची संख्या लक्षणीय आहे. देश भक्तीपर गीतां मुळे मावळ्यांमध्ये उत्साह वाढत होता. ठिकठिकाणी महिलांनी आरती करून दौडी चे स्वागत केले. किल्ला येथे महार रेजिमेंट च्या वतीने दौडीच्या स्वागत करण्यात आले कर्नल ब्रिजेश आणी मार्केट पोलीस ए सी पी बर्मनी यांच्या हस्ते आरती करून दौडीची सांगता करण्यात आली.
चावट गल्ली येथील सौ सुरेखा सुधाकर शिरवलकर यांच्या जन्म दिना निमित्त सुधाकर शिरवलकर यांनी रायगड येथे पुनरप्रस्तापित होणाऱ्या सुवर्ण सिंहासन साठी ₹ 11111 /-चा धनादेश किरण गावडे यांच्या कडे सुपूर्द केला.
उद्या ची दौड
छत्रपती श्री शिवाजी कॉलनी टिळकवाडी ते महालक्ष्मी मंदिर अनगोळ.