पीएलडी बँकेचे राजकारणात अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आता पुन्हा एपीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडून येत्या 17 रोजी होणार आहे. मात्र मागीलवेळीचा कित्ताच या निवडणुकीतही दिसून येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
15 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील 20 महिन्याचा कार्यकाळ संपला असून यासाठी आता 17 रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी सचिव, सदस्य बाजार समिती अधिकारी यांना निवडणुकीसाठी बोलवण्यात आले आहे.
एपीएमसी च्या अध्यक्ष पदासाठी 17 जणांना मतदानाचा अधिकार आहे. शेतकरी संघातून निवडून आलेले 11, व्यापारी प्रतिनिधी 2, सोसायटी प्रतिनिधी1, असे 14 तर तिघा सरकार नियुक्त नामनिर्देश सदस्यांचा समावेश आहे. अध्यक्षपदासाठी तानाजी पाटील, अनंत पाटील आणि रेणूका पाटील दुसऱ्या गटातून सुधीर गड्डे, युवराज कदम रिंगणात आहेत.
आमदार सतीश जारकीहोळी आणि आमदार लक्षमी हेब्बाळकर यांच्यात या निवडणुकी वरून देखील आता चांगलीच जुंपणार आहे. पीएलडी बँकेत अक्काने बाजी मारली तरी एपीएमसी मध्ये मात्र जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व राहणार असल्याचे दिसून येत आहे. कोणत्या गटाचा अध्यक्ष होणार हे अजून स्पष्ट झाले नसले तरी नेत्यांच्या प्रतिष्ठेचीच ही निवडणूक असणारा आहे.
निवडणूक 17 तारखेला असली तरी अजूनही म्हणावे तेवढा राजकारण तापलेल नाही मात्र सतीश जारकिहोळी यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली आहे तर लक्ष्मी यांनी अजूनही आपले पत्ते खोलले नाहीत.