Tuesday, April 30, 2024

/

बेळगावात दुर्गामाता दौडीला उत्साहात प्रारंभ

 belgaum

शिवछत्रपतींच्या नावाचा अखंड गजर करीत श्री दुर्गामाता दौडीला आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर बेळगाव शहरात प्रारंभ झाला पहिल्याच दिवशी दौडीला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.पुढील आठ दिवसात दौडी मध्ये शिव शंभू भक्त मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार पहिल्याच दिवशी दिसून आला.

Durgamata doud
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे अयोजित दुर्गामाता दौडीच्या निमित्ताने शहर आणि परिसरात चैतन्यादायी वातावरण निर्माण झाले आहे.दौडीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या दौडी मध्ये सहभागी शिवप्रेमीं वर पुष्पवृष्टी करून नागरिकांनी आपल्या सदिच्छा प्रकट केल्या.

छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथे महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून वासुदेव छत्रे गुरुजी यांच्या हस्ते ध्वज चढवून दौडीस प्रारंभ करण्यात आला.

 belgaum

संतसेने मार्गावरून दौड मार्गस्थ होऊन संपूर्ण शास्त्री नगर, गुड्स शेड रोड, कपिलेश्वर कॉलनी , महाद्वार रोड येथे मार्गक्रमण करीत दौड कपिलेश्वर मंदिर येथे पोहोचली प्रसिद्ध वकील शामसुंदर पत्तार, प्रताप यादव यांच्या हस्ते आरती करून दौडीची सांगता करण्यात आली.विविध ठिकाणी दौडीचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.

उद्या ची दौड

श्री गणेश मंदिर (राणी चननमा चौक ते दुर्गा माता मंदिर (किल्ला)

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.