भरधाव बी एम डब्ल्यू ने तरुणीला चिरडल्या नंतर संतप्त जमावाने कार पेटवून गाडीची मोडतोड केल्या प्रकरणी माळ मारुती पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
सोमवारी सायंकाळी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महा मार्गावर न्यू गांधी नगर जवळ हायवेवर ही घटना घडली होती. तहनियत वाहिद बिशती वय 18 रा.आज़ाद नगर,मन रोड बेळगाव ही तरुणी जागीच ठार झाली होती. अपघात होताच चिडलेल्या जमावाने बी एम डब्ल्यू कारची नासधूस करून गाडी पेटवली मात्र लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली आणि कार चालकांना जमावा कडून वाचवले होते.
रहदारी पोलिसांनी क्वेल ग्लेन टेलको रा.कलंगुट गोवा या गाडी मालकांवर रहदारी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर कायदा हातात घेऊन गाडीची मोडतोड केल्या प्रकरणी माळ मारुती पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी ही कारवाई केली आहे.
माळ मारुती पोलिसांनी मजहर, मोहम्मद कैफ,अब्रार,अंजला,तौफिक,अफझल,सलमान सर्वजण रा.उजवलनगर आझाद नगर बेळगाव अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.