आॅक्टोबर महिन्यात हीट बरोबर साथीचे रोग सुद्धा सुरू होतात. दसरा सुट्ट्या लागल्यापासून बर्याच मुलांना चिकनपॉक्स या विकाराने पुरते जेरीस आणले आहे.हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळणारा आजार आहे. परंतु यावेळच्या साथीमध्ये बर्याच मोठ्यांनाही याची लागण झाली आहे. हा एक संसर्गजन्य साथीचा विकार आहे. मुख्यत: तीन व सहा वर्ष वयोगटातल्या मुलांना कांजण्या होतात. मोठ्या मुलांना झाल्यास त्या बर्याच तीव्र स्वरुपाच्या असतात. सहा महिन्यांपेक्षा लहान तान्ह्या मुलांना आईकडून निसर्गत:च प्रतिकारशक्ती मिळालेली असते. त्यामुळे गंभीररित्या मूल आजारी असल्यासच सहा महिन्याच्या आत वाराफोड्या येतात अन्यथा नाही.
कारणे व लक्षणे : सुरुवातीला थोडा ताप, किंचित डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवतो. त्याबरोबरच सर्दी, खोकलाही होतो. एखाद दोन दिवस असे होऊन अंगावर पुरळ उठतात. पुरळ बहुदा पाठीवरचा भाग, छाती यावर जास्त दिसतात. आजाराचे स्वरुप जास्त असेल तर पुरळ चेहर्यावर, पायावर येतात. पुरळ सुरुवातीला लाल असतात. नंतर त्यात पू होतो. शेवटी खपली धरते. शरीराच्या निरनिराहळ्या भागावर हे पुरवळ एक दोन दिवसाच्या अंतराने येतात किंवा टप्प्यात येतात. त्यामुळे कांजिण्याचे फोड नव्याने येत असताना काही ठिकाणच्या कांजण्यांच्या खपल्या सुटून वाळायला सुरुवात झालेली असते. 10 ते 12 दिवसातच विकार कमी होतो. परंतु बहुतेक वेळा 14 व्या 15 व्या दिवचशी सर्वच कांजण्या मावळतात.
काही विशिष्ट विषाणूमुळे कांजण्या होतात. संशोधनानुसार काही व्यक्तींमध्ये हे विषाणू कांजण्या होऊन गेल्यावर सुप्तावस्तेत राहतात आणि प्रौढावस्थेत ‘नागीण’ या रोगाद्वारे बाहेर पडतात. नागीण या रोगाचे स्वरुप गंभीर असते. मुलांचा आहार सदोष, अवेळी किंवा कमी प्रमाणात असल्यास, अस्वच्छतेमुळे संसर्ग लवकर होतो. अशक्त मुलांची प्रतिकाशक्ती कमी असते. त्यामुळे लवकर आजार कमी होत नाही.
उपचार
होमिओपॅथी : आजुबाजूला साथ चालू असल्यास प्रतिबंधक म्हणून घेण्याची औषधे होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या पालकांनी वेळीच ही औषधे मुलांना द्यावीत. उपचारासाठीसुद्धा दुष्परिणामविरहित होमिओपॅथी मुलांच्या आजारामध्ये अतिशय उपयुक्त आहे. उदा. अकोनाईट, तीव्र ताप, चेहरा लालबुंद होऊन टपोरे फोड येतात. चेहरला तकतकीत दिसतो.
पल्सेटिला : अतिशय ताप पण तहान लागत नाही. घसा कोरडा असून मोकळ्या हवेत, वार्यात फिरावेसे वाटते.
रसटॉक्स : फोड्या आल्यावर असह्य खाज पडते. रुग्ण अतिशय बेचैन असतो. झोपून रहावत नाही. जिभेचे टोक अगदी लाल भडक होते. तापात रुग्ण बरळत राहतो.
बायोकेमिक : कालीमूर 6एक्स फेरमफॉस 6 एक्स यांचे संयुक्त औषध उपयोगी आहे.
निसर्गोपचार
1) अर्धा कप ब्राऊन व्हिगेनर आंघोळीच्या कोमट पाण्यात घालून बाळाला आंघोळ घालावी. त्यामुळे कातडीची खाज कमी होते.
2) बेकिंग सोडा थोडासा घालून पाण्याने बाळाचे अंग पुसून घ्यावे. कांजिण्यांना खपल्या धरल्या की त्यांना खाज सुटते. सोड्यामुळे कांजण्या खाजत नाहीत.
3) नाचणीचे किंवा ओटचे सत्व (सातू) पाण्यात कालवून फोडांवर लावावे. दाह कमी होतो.
4) ई जीवनसत्वयुक्त तेल कांजिण्या येऊन गेल्यावर रोज बाळाच्या अंगाला चोळावे. मग आंघोळ घालावी. अशाने डाग पुसट होतात. व त्वचा पुनश्च: मुलायम होते.
इतर : बाळाच्या शरीराची स्वच्छता असणे जरुरीचे आहे. रोज अंघोळ घालावी. फार ताप असल्यास कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने स्पंजिंग करावे. काही विशिष्ठ होमिओपॅथिक औषधांची मलमे जखमांवर, फोडांवर लावावीत. त्यासाठी व उपचारांसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. बाळाची नखे कापावीत. कपडे वेगळेच धुवावेत.