वनविभागात सहाय्यक वनसंरक्षणाधिकारी पदावर व्यक्तीला बेनामी मालमत्ता जमवून वन खात्याचीच लूट करण्याचा प्रकार चांगलाच अंगलट आला असून एसीबी पोलीस पथकाने त्याच्यावर धाड टाकली आहे.
चंद्रगौडा बी पाटील या वनविभागाच्या अधिकाऱ्यावर ही कारवाई झाली आहे. अरण्य विभागाच्या खानापूर परिक्षेत्रात तो कार्यरत होता त्याच्या रामतीर्थ नगर येथील बंगल्यावर ही धाड टाकण्यात आली आहे.
एसीबीचे पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी ही कारवाई केली आहे.अनेक आरोप आल्यानंतर भ्रष्टाचार करून बेनामी मालमत्ता जमविल्याचा ठपका ठेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी ६ वाजल्यापासून या धाडीला सुरुवात करण्यात आली होती.
चंद्रगौडा यांचे रामतीर्थ नगर येथील घर, खानापूर येथील ऑफिस आणि बैलहोंगल येथील त्यांच्या भावाच्या घरावर एकाच वेळी ही धाड मारण्यात आली आहे.
मालमत्तेची मोजणी सुरू असून एकूण किती रुपयांची बेनामी मालमत्ता सापडली याचा तपशील अध्याप एसीबी ने जाहीर केलेला नाही.
कालपासून बंगळूर व इतर भागात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर धाडीचे सत्र एसीबीने सुरू केले आहे. बागलकोट येथील ग्रामीण जलपुरवठा विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंते चिदानंद बी मींचीनाळ यांच्यावरही बागलकोट येथे धाडी पडल्याची माहिती मिळाली आहे.