लग्न होऊन केवळ चार महिने झालेल्या अयोध्या नगर टिळकवाडी येथील एका नव विवाहितेने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे.शुक्रवारी रात्री सदर घटना घडली आहे.
रेश्मा अमर तुरकेवाडीकर वय २१ रा.अयोध्या नगर असे त्या विवाहित महिलेचं नाव आहे. सदर महिलेने ओढणी ने गळफास लावून आत्महत्या केली मात्र याच नेमकं कारण अजून समजू शकले नाही.टिळकवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.