बेळगावातील एका नामवंत सहकारी बँकेच्या अध्यक्षाने केलेले पाप सध्या व्हायरल झाले आहे. त्याच बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याशी आमिष दाखवून केलेलं लफडं आता त्याच्या अंगाशी आल्याने ते रोखण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.मात्र या प्रकरणात त्याला कोणाची साथ मिळत नसून तो गोत्यात अडकला आहे.
अध्यक्षाने सुरुवातीच्या काळात बँकेत नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी सोबत केली काही रक्कम ही उचलली होती मात्र नोकरीचं आश्वासन पूर्ण न झाल्याने तिने त्या अध्यक्षाला तगादा लावायला सुरुवात केली. हे प्रकरण काही जेष्ठ संचालकांच्या निदर्शनास आलं असून शहरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सदर बँकेचा मोठा कार्यक्रम जवळ आल्याने असा आरोप झालेला अध्यक्ष नको दुसऱ्याला अध्यक्ष करून कार्यक्रम करू अश्या हालचाली संचालकांनी सुरू केल्या आहेत. सदर महिलेची किव करून जेष्ठ संचालकांनी नोकरी वर पर्मनंट केलं मात्र महिलेला नोकरीचं अमिष दाखवून तिच्याशी सोबत केलेल्या त्या अध्यक्षाची मात्र बरीच बदनामी होताना दिसत आहे.
सहकार क्षेत्रात मिळालेल्या पदाचा गैरवापर करून हा लिंगपिसाट अध्यक्ष त्या महिलेकडून आर्थिक आणि शारीरिक लाभ घेत होता, आता त्या महिलेने आवाज उठवल्याने त्याची गोची झाली असून अशा व्यक्तींना अशा पदांवर ठेवायचे की नाही याचा निर्णय त्या बँकेने लवकरात लवकर न घेतल्यास बँकेच्या नावालाही बट्टा लागणार आहे.