बेळगावातील राणी चन्नमा विद्यापीठात झालेल्या रक्तदान शिबीरास अनेक कार्यक्रमात स्थानिक आमदार सतीश जारकीहोळी डावलल्याचा आरोप करत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. होसमनी यांच्यावर आमदार समर्थकानीं हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. काकती जिल्हा पंचायत सदस्य सिध्दु सुणगर यांच्या
कार्यकर्त्यांकडुन ही मारहाण झाली आहे.
राणी चन्नमा विद्यापीठात झालेल्या स्वयंप्रेरीत रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमाला आणि गेल्या काही दिवसात झालेल्या तीन कार्यक्रमात स्थानिक आमदारांना आमंत्रण न देता जाणीव पुर्वक डावलण्यात आले असा आरोप करत जिल्हा पंचायत सदस्य सिद्ध सुनगार यांच्या समर्थकांनी निषेध करीत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.होसमनी त्यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी टेबल ग्लासची नासधुस करण्यात आली आहे. सिध्दु सुणगर हे आमदार सतिश जारकिहोळी यांचे निकटवर्तीय आहेत.
चारदिवसांपुर्वी रक्तदान शिबीर कार्यक्रमाव्यतिरिक्त राष्ट्रीय महामार्गाजवळ चार दिवसांपुर्वी झालेल्या पुलाच्या कामाच्या शुभारंभाला आमदार सतिश जारकिहोळी आणि खासदार प्रकाश हुक्केरींना का आमंत्रीत करण्यात नसल्याने हा हल्ला झाला आहे.
सोमवारी सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आर सी यु मध्ये जाऊन प्रकाश हुक्केरी आणि सतीश जारकीहोळी यांना का आमंत्रण दिले नाही असा जाब विचारला त्यावेळी उपकुलसचिवांनी एक तास भेट न देता ताटकळत ठेवले त्यामुळे चिडलेल्या काँग्रेस कार्यकर्ते कार्यक्रमात घुसून गोंधळ घातला प्रा होसमनी यांना मारहाण केली त्यांनी सुरक्षा रक्षकांनी यमकनमर्डी काँग्रेस कार्यकर्त्यांना देखील धक्काबुक्की केली.
या घटनेत दोन्ही कडचे अनेक जण जखमी झाले आहेत.