एक ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस…
आधुनिक उपचार पद्धतीमुळे प्रत्येक व्यक्तीची वयोमर्यादा वाढली असून यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील वाढली आहे. पण वाढत्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांनाही जन्म दिला आहे. वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते आणि त्यातच शारीरिक व्याधी मागे लागतात. शारीरिक व्याधींसाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते आणि नेमकं ज्यावेळी त्यांना मुलांचा आधार हवा असतो तो हल्ली मिळताना दिसत नाही म्हणूनच या जेष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो.
जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सावली वृद्धाश्रमातील वयोवृद्ध व्यक्तींना कौटुंबिक आनंद देण्यासाठीच सखी तर्फे भेट देण्यात आली . यांना चांगले आरोग्य लाभूदे आणि यांचे उर्वरित आयुष्य आनंदात जाऊदे अशी प्रार्थना करत जायंट्स सखी तर्फे ‘सावली’ वृध्दाश्रमातील मेंबर ना टॉवेल गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. आणि ग्रुप तर्फे जेवण देण्यात आले.