सिमला दौरा उरकून परत येत असताना कमिशन च्या कारणावरून दोन कन्नड नगरसेवकात बसमध्ये मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे.
खर्चाची जबाबदारी असणाऱ्या नगरसेवकाला दुसऱ्या नगरसेवकाने आपल्याला पाच लाख रुपये पाहिजेत म्हणून चंदीगड पासून भंडावून सोडले होते. त्याने एक लाख देण्याची तयारी दाखवली पण दुसरा मानला नाही अखेर मुंबईहून बेळगावला येत असताना बस मध्ये त्या दोघांनी मारामारी केली आहे.
पूर्ण दौऱ्यात खर्च करण्याची जबाबदारी एक नगरसेवकाला देण्यात आली होती. तू जास्त पैसे उरवलास मला त्यातले पाच लाख दे नाहीतर मी सगळ्यांना सांगतो अशी धमकी त्या दुसऱ्या नगरसेवकाने दिली होती. पहिल्याने दोन लाख रुपये उरलेत असे सांगून त्यातले एक लाख देतो असे सांगितले पण दुसरा पाच लाखावर असून बसला.
बसने मुंबई सोडून पनवेल गाठले तेंव्हा त्यांच्यातला वाद वाढला आणि दोघांनीही एकमेकांवर मारहाण सुरू केली. बाकीच्या नगरसेवकांना हा वाद मिटवावा लागला.
नगरसेवकांचा जनतेच्या करावर झालेला हा दौरा वेगवेगळ्या निमित्ताने वादाचा ठरला आहे. आता ते कमिशन च्या मारहाणीचे प्रकरण गाजत आहे. अभ्यासाच्या नावाखाली केलेली मौज मजा आणि खरेदी, पत्रकारांना दिलेल्या खोट्या पायपीटच्या बातम्या आणि इतर अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत.
शाळेची मुलेही सहलीला गेली की न भांडता मिळून मिसळून परत येतात. पण ३५ ते ५५ वयोगटातील नगरसेवकांनी आपली मर्यादा सोडून दिल्याने जनतेने त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची हा प्रश्न आहे.
*चर्चा त्या कॉमन डान्स ची*
परतीचा प्रवास सुरु होण्यापूर्वी झालेल्या कॉमन डान्स चीही सध्या चर्चा आहे. हा डान्स कुणीही रेकॉर्ड करू नये म्हणून डान्स करण्यापूर्वी एकाने सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले होते. एकूणच बेळगावच्या नगरसेवकांचा भांगडा आणि बसमध्ये झालेला मारहाणीचा त्रागडा चर्चेत आहे.