बेळगावची माणसे कधी काय करतील आणि देशात नव्हे तर जागतिक पातळीवर आपला झेंडा रोवतील याचा नेम नाही.
आंग्रीया हे मुंबई ते गोवा मार्गावरील देशातील पहिले प्रवासी क्रूझ लवकरच सुरू होणार आहे आणि ते सुरू करत आहेत बेळगावचे कॅप्टन नितीन धोंड.
मर्चंट नेव्हीत कॅप्टन म्हणून जीवन घालवलेल्या धोंड यांनी आपले एक स्वप्न पूर्ण केले असून बेळगावसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
मुंबई ते गोवा आणि परत गोवा ते मुंबई असा आलिशान समुद्र प्रवास हे क्रूझ करणार आहे. आंग्रीय या नावाचा सुद्धा एक इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा नौदलाचे पहिले प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या आडनावावरून हे नाव निश्चित करण्यात आले आहे. नितीन धोंड हे तरुण भारताचे प्रमुख किरण ठाकूर यांचे भाचे आहेतच शिवाय आपल्या स्वप्नगंधा व वाइल्डर नेस्ट या जगप्रसिद्ध रिसॉर्ट च्या माध्यमातूनही जगप्रसिद्ध आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि आंग्रीय सी ईगल प्रा ली च्या वतीने ही सेवा चालणार आहे. पर्यटनाच्या निमित्ताने स्थानिकांना रोजगार आणि इतर अनेक चांगले हेतू या प्रकल्पाने आखले आहेत. कोकण भागाचा इतिहास आणि जैव वैविध्य यांची सांगड घालून हे क्रूझ चालणार आहे.
१२ ऑक्टोबर पासून या प्रवासाला सुरुवात होत आहे. हे क्रूझ सुरू करणारे कॅप्टन नितीन धोंड हे मर्चंट नेव्हीतील आपल्या अनुभवी कारकिर्दीने प्रसिद्ध आहेत. त्यांना कोकण रत्न हा पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे.
आंग्रीया चे बुकिंग लवकरच www.angriyacruises.com या साईट वर सुरू होणार आहे. देशात आदर्श निर्माण करणारे काम बेळगावच्या कॅप्टन नी करून दाखवले आहे.
सर्व छायाचित्रे
www.angriycruises.com वरून घेतली आहेत.