गेल्या महिन्यात इंडोनेशिया येथील जकार्ता येथे आशियाई स्पर्धेत कुराश या खेळात कांस्य पदक मिळवलेली बेळगावची कन्या मलप्रभा जाधवला आता के एल इ संस्था दस्तक घेणार आहे.
बेळगाव शहराचं नाव उज्वल केलेल्या मलप्रभेला ऑलम्पिक मेडल मिळवण्यासाठी के एल इ पुढाकार घेतला असल्याची माहिती राज्यसभा सदस्य डॉ प्रभाकर कोरे यांनी दिली.
के एल इ संस्थेला पी एम ओ कडून देखील सूचना मिळाल्या होत्या त्यानुसार या संस्थेने या खेळाडूस दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे आज पासून मलप्रभा के एल इ ची मुलगी असेल असे कोरे म्हणाले.
बेळगावातचं के एल इ कडून मलप्रभाला कोचिंगची सर्व सोय करण्यात येणार आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक उपलब्ध करून देणे,स्विमिंग पूल,जिम, रहाणे सगळी सोय केली जाणार आहे.
यामुळेच झाली दत्तक…..
एशियन गेम्स मध्ये मेडल मिळवल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलप्रभा जाधव हिने पंतप्रधान मोदी यांच्या सोबत स्नेह भोजन केलं होतं त्यावेळी मलप्रभेने मी बेळगावची असून कुराश किट आणि विदेशी कोचिंग स्व खर्चाने घेऊन आपण हे पदक मिळवलं असल्याचं पंतप्रधान मोदी यांना सांगितलं होतं त्यावेळी मोदी यांनी मलप्रभाला तू बेळगावात कोरेना जाऊन भेट कोरे यांना भेट तुला मदत होईल असं सांगितलं होतं त्या नंतर ऑलम्पिक मेडल मिळवण्याच स्वप्न उराशी बाळगलेल्या खेळाडुला के एल इ सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहे.