जुन्या रूढी अजूनही कायम असल्याचे काही प्रकार आजही घडत असल्याचे दिसून येत आहे. रायबाग तालुक्यातील बन्नूर तांड्यात असा प्रकार घडला आहे. त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना गावाबाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन दिले आहे.
त्या कुटुंबियांची सुमारे २४ एकर जमीन असून त्यापैकी केवळ ७ एकर ते कसत होते. सातत्याने त्यांना तेथूल ग्रामस्थ त्रास करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला आमचे घर आणि शेती परत करवी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. आणि याबाबत संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेले असता ते यलात आम्हालाच धमकी देत आहेत. त्यामुळे न्याय कोणाकडे मागायाचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आजही बहिष्कार सारख्या घटना घडतात आणि प्रशासन ते निमूटपणे बघते याला काय म्हणावे? त्यामुळे आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय समोर सर्व कुटुंबातील सदस्यानी आंदोलन करून न्याय देण्याची मागणी केली. सदर निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे