Monday, January 6, 2025

/

‘घर विकून २२ लाख देणारा बाबूल चाचा संदीपसाठी बनला खुदा’

 belgaum

रुग्णाचे नाव संदीप मुचंडी.
राहणार दत्तात्रय गल्ली, वडगाव. धर्म हिंदू.
अडचण लिव्हर खराब झालेली. मदतकर्ता बाबूल पठाण उर्फ चाचा.
स्वतःचं घर विकून केलेली मदत २२ लाख.
होय एक मुस्लिम व्यक्तीने स्वतः चे घर विकून एक पिडीत हिंदू तरुणाला जगण्यासाठी मदत केली आहे.
ही मदत अनमोल आहे. जाती धर्माची बंधने लादणार्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

संदीप याची लिव्हर खराब झाली होती. तो फक्त काही महिने जगणार होता. लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नव्हता. ३० लाख खर्च आणि कुणाच्यातरी लिव्हर चा पाव भाग त्याला पाहिजे होता.

Babul chacha

बाबूल यांनीं आपल्या मुलाला तयार केले. ,लिव्हर द्यायला तो तयार झाला. पण एक अपघाती मृत्यू झालेला रुग्ण सापडला.लिव्हर ची सोय झाली अडचण होती ती पैशांची,
बाबूल चाचा एक मसीहा बनून तयार झाले.त्यांनी आपले घर विकून ही रक्कम उभी केली आणि आज संदीप सुखरूप आहे. उर्वरित रक्कम संदीपच्या घरच्या माणसांनी उभी केली आहे. तर चाचा ने उचललेला वाटा मोठा आहे.
बेळगावात आणि परिसरात दोन धर्मियात दगडफेक व  जाळपोळीच्या हिंसात्मक घटना वारंवार होत असतात. या घटना घडवून आणणारे राक्षस वेगळे आणि एक माणुसकीचं नातं म्हणून धर्म भिंती तोडत अनेकांना मदत करण्याचं कार्य करणारे माणुसकीचे पुजारी वेगळे. वडगाव येथील बाबुल पठाण असेच धर्म आणि जातीच्या भिंतीच्या पलीकडे माणुसकीचे काम करत आलेत.

यापूर्वीही त्यांनी अनेकांना मदत केली आहे.घरची स्थिती हालाखीची असलेले कारभार गल्ली येथील कृष्णा बाळेकुंद्री हे आजारी होते, त्यांना दवाखान्यात दाखल करण्याइतकी त्यांच्या कुटुंबियाची ऐपत नव्हती अश्याना त्यांनी  सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल केलं, तसेच स्वतः होऊन त्यांच्या उपचारांचा आर्थिक भार उचलला होता आणि सुश्रुषाही केली होती.

बाबुल हे विष्णू गल्ली वडगावचे रहिवासी असून बाजार गल्ली वडगावात त्याचं सायकलचं दुकान आहे .इतर व्यवसाय देखील ते करत असतात आज वयाच्या ६९ व्या वर्षी देखील ते अनेकांना जात धर्म भेद विसरून मदत करत असतात. वडगाव भागातील अनेक तंटे वाद भांडणे मिटवण्यात एक  पंच म्हणून देखील ते आघाडीवर असतात. त्यामुळे वडगावात बाबुलचाचा या  नावाची ख्याती आहे.जरी धर्माने मुस्लीम असले तरी जात धर्म भेद भाव न मानता ते सेवाभाव जपतंच आलेत.

 

अनेक गरजू लोकांना उपचारासाठी मदत करण हे त्याचं काम .आपल्या खिशातील ५० रुपये पासून १०० ,२०० पाचशे हजार जसे जमेल तसे वैदयकिय मदत ते लोकांना करत असतात. कायम मराठी लोकातून असतात कायम मराठी बोलत असतात.  अनेकांना त्यांनी घर बांधण्यास मदत केली आहे कर्ज काढून दिली आहेत. मच्छे येथील यल्लापा कुरबर नावाच्या युवकास त्यांनी ६ लाख कर्ज बँकेतून मिळवून दिलंय.मागील वर्षी झालेल्या मच्छे लक्ष्मी यात्रे दरम्यान बाबुल हे यल्लापा नावाच्या युवकाच्या घरी जेवणाला गेले असता त्या युवकाच घर केवळ लहान आहे म्हणून नवीन घर बनवण्यासाठी त्यांनी आपल्या घरचे कागदपत्रे गहाण ठेऊन कर्ज मिळवून दिलंय.

babul pathan

File photo-babul pathan

आजच्या युगात कोण कुणाला स्वार्था शिवाय फुटकी कवडी पंण  देत नाही मात्र घरबांधायला मदत असुदेत किंवा उपचाराला मदत असुदेत निस्वार्थपणे केवळ माणुसकीचं नात जपणाऱ्या बाबुल सारख्याचं कार्य म्हणजे   धर्मांध लोकांना चपराक आहे. आज बेळगावात बाबुल पठाण सारख्या आपल्या ऐपतीने का असेना मदत करून धार्मिक सौहार्द जपणाऱ्यांची गरज आहे.

आजचा समाज बरबटलाय जाती आणि धर्मभेदाने, अशा वातावरणातही हा बाबूल माणुसकीचा धर्म निभावतोय, त्याला बेळगाव live चा सलाम…

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.