15 नोव्हेंबर च्या आत गोगटे सर्कल उड्डाण पूल सुरू करा अश्या सूचना खासदार सुरेश अंगडी यांनी दक्षिण पश्चिम विभागाच्या रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या आहेत.बुडा कार्यालयात उड्डाण पुला संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
तिसऱ्या रेल्वे गेटच्या उड्डाण पुलाचे काम 15 ऑक्टोम्बर रोजी करू अशी घोषणा देखील अंगडी यांनी बैठकीत केली पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वे गेट वर देखील एक प्रकारचे उड्डाण पूल बनवले जाईल तसा प्रस्ताव रेल्वे खात्याला पाठवला आहे असे देखील त्यांनी सांगितले.आर सी यु जवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अंडर पास बनवणार असून 27 सप्टेंबर रोजी याच भूमी पूजन देखील करणार असल्याचे अंगडी म्हणाले.
खासदार अंगडी यांनी 15 नोव्हेंबर च्या आत गोगटे सर्कल उड्डाण पूल वाहतुकीसाठी सुरू करा अश्या सूचना जरी दिल्या असल्या तरी ठेकेदारा नुसार सदर ब्रिज चे काम पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे आणि ती एप्रिल 2019 रोजी संपते त्यामुळं ब्रिज चे काम पूर्ण होणार का याकडे जनतेचं लक्ष लागून राहिले आहे.
अशी आहे या गोगटे सर्कल उड्डाण पुलाची माहिती
ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हर ब्रिज पूर्ण होण्यास सरकारी डेडलाईन एप्रिल २०१९ पर्यंत आहे.
हे ११० वर्षीय ब्रिज गोगटे सर्कल ते गोवावेस ही दोन केंद्रे जोडण्याचे काम करते. मागच्या वर्षी २०१७ च्या ऑक्टोबर महिन्यात या ब्रिज च्या कामाची सुरुवात झाली.
१४ ऑक्टोबर २०१७ पासून हे ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. १९०१ मध्ये ब्रिटिश सरकारने हे ब्रिज बांधण्याची सुरुवात केले होते, आणी १९०५ मध्ये ते बांधून पूर्ण झाले होते. २००५ मध्ये इंग्लंड मध्ये कार्यरत त्या कंपनीने बेळगाव मनपाला पत्र लिहून हे ब्रिज आता जुने झाले आहे, पाडवून परत बांधा अशी सूचना केली होती.
२०१५ मध्ये सूचना होऊनही २०१७ मध्ये कामाला सुरुवात झाली. कॉन्ट्रॅक्टर ला काम पूर्ण करण्यास १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. म्हणजेच एप्रिल २०१९ पर्यंत काम पूर्ण होण्याची गरज आहे.