खासदारकीची निवडणूक झाल्यानंतर मतदारसंघाकडे पाठ फिरवल्याचा आरोप खासदार सुरेश अंगडी यांच्यावर कायम होत असतो. याच बरोबर मतदार नव्हे तर आपल्याच भाजप पक्षातील कार्यकर्त्यांकडेही पाठ फिरवल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनीच गाडी अडवून भर रस्त्यात अंगडी यांना दणका दिला आहे.
निवडणूक झाल्यावर कधीच न आलेले खासदार अंगडी अचानक कुद्रेमनी गावात आले होते. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. आणि रस्त्यावरच जाब विचारला. प्रधानमंत्री गॅस योजनेचे उद्घाटन करताना काँग्रेसचे कार्यकर्ते आणि लोक घेऊन जाताना भाजपचे कार्यकर्ते दिसले नाहीत काय असा प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडले.
तुम्हाला भाजप कार्यकर्त्यांची गरज नाही काय असा प्रश्नही विचारल्यावर अंगडी यांना काय बोलायचे समजत नव्हते.
मी गोकाकला गेलो होतो असे अंगडी यांनी म्हटल्यावर कायतरी उत्तर देऊ नका असे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितले आहे.