बेळगांव तालुक्यातील काकती येथील तालुक्याचे लक्ष्य लागून असलेल्या ‘मार्कडेय को-ऑप शुगर मिलची निवडणूक दि. २८ सप्टेंबर रोजी जाहिर झाली आहे. इच्छुक उमेवारांनी माघार घेवून १४ पैकी १३ जागा बिनविरोध निवड झाल्याने विद्यमान चेअरमन अविनाश पोतदार गटाकडे एकहाती सत्ता देवून कारखाना सुरळीत या वर्षीपासून सुरू व्हावा, कारखान्याच्या हितासाठी म्हणून माघार घेतली. मात्र एक जागेसाठी ‘ ब ‘ वर्ग सहकारी संस्था गटातून सरळ लढत मनोहर हुक्केरीकर यांच्याशी होणार आहे.
यंदाचे हंगाम घेण्यासाठी संचालक मंडळाने शर्तीचे प्रयत्न केले आहेत. कारखाना यंदा पहिलं गळीत हंगाम घेण्याचे प्रयत्नशील आहे . तसेच आत्तापर्यंत बिनविरोध संचालक निवडले जात होते. यावेळी सुद्धा बिनविरोध निवड करण्यासाठी अॅड. किसन यळ्ळूरकर , अविनाश पोतदार, माजी आमदार एस.सी.माळगी,तानाजी पाटील व जि.पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले. मात्र ‘ब ‘ वर्ग सहकारी संस्था गटांतून एक जागेसाठी निवडणूक ही अटळ झाल्याने सभासद वर्गात नाराजी पसरली आहे.
या गटातून मनोहर हुक्केरीकर उभे असून ते विद्यमान संचालक होते. या काळात त्यांनी गांवोगावी शेअर्स करण्यासाठी पूर्व भाग पालथा घातला.ते गणेश मल्टी पर्पज को-ऑप.सोसायटीचे संस्थापक चेअरमन असून त्यांनी सोसायटीच्या माध्यमातून कारखान्याला ३५ लाख रुपयाची ठेवीरूपाने सहकार्य करून कामकाज अंतिम टप्प्यात आणून बेळगांव तालुक्यातील हा एकमेव साखर कारखाना सुरू व्हावा ही त्यांची मनस्वी ईच्छा . त्याच बरोबर आपल्या संचालक काळात कारखान्यातील मशिनरी साठी २८ते ३० कोटींची कामे झाली आहेत. असे तज्ञ आणि अभ्यासू असलेले मनोहर हुक्केरीकर सहकारी संस्था ‘ब ‘ गटांतून येणे कारखान्याचा हितासाठी जरुरीचे आहे. अशी सभासद वर्गातून चर्चा होत आहे .
१३ जणांची बिनविरोध निवड सामान्य ‘अ ‘गटातून अविनाश रामभाऊ पोतदार,तानाजी मिनाजी पाटील, अनिल शंकर कुट्रे, मनोहर लक्ष्मणराव होनगेकर, सुमित यल्लोजीराव पिंगट व भाऊराव जयवंत पाटील सामान्य ‘अ ‘ महिला गटातून निलिमा मनोज पावशे व वसुधा वसंत म्हाळोजी तर ‘अ ‘ वर्ग एस .सी. गटातून परशराम शट्टापा कोलकार, तसेच ‘अ ‘ एस.टी.गटातून लक्ष्मण शिवाजी नाईक याच बरोबर ‘अ ‘ओबिसी गावातून बसवराज दुंडाप्पा गणीजेर व सदेप्पा भावकाना राजकट्टी आणि ‘ड ‘ वर्ग गटामधून भारत गंगाधर शानभाग असे १४ पैकी १३ जण बिनविरुद्ध निवड झाल्याने ऊस उत्पादक सभासद वर्गात समाधान व्यक्त करताहेत.
‘ब ‘ वर्ग सहकारी संस्था गटातील मनोहर शंकर हुक्केरीकर यांनी ‘शिलाई मशिन ‘ चिन्हांवर ही निवडणूक लढवून विजयी होण्याचा आशावाद व्यक्त केला.