बेळगाव येथील टिपू सुलतान संघर्ष समितीने बेळगाव मध्ये जातीय तणाव निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांच्याकडे केली आहे.
रविवार दि २३ ला विरभद्रनगर व काकर गल्ली येथे दगडफेक च्या घटना घडल्या. समाजकंटकांनी दगडफेक केली आणि घरे व गाड्यांचे नुकसान केले. या प्रकरणात प्रामाणिक मुस्लिम कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. पोलीस दलातील काही व्यक्ती सुद्धा या कटात सहभागी आहेत. तेंव्हा योग्य चौकशी होऊन समाजकंटकांवर कारवाई करावी आणि प्रामाणिक तरुणांना सोडून द्यावे अशी मागणी केली आहे.
निवेदन देणाऱ्यांमध्ये काकर मोहल्ला, विरभद्रनगर, बाशीबन, आसद खान सोसायटी, शेट्टी गल्ली, कोतवाल गल्ली येथील जमातींचे सदस्य उपस्थित होते.