रविवार रात्रभर डॉल्बी आवाज,ढोल ताशा पथकांच्या गजरात, पारंपरिक वाद्य वाजवत सुरू असलेली गणरायाच्या निरोपाची मिरवणूक, दगडफेकीच्या घटना मंडळातील वाद अश्या विघ्नां वर मात करत अगदी जल्लोषात सुरू आहे.
सकाळी साडे आठ पर्यंत कपिलेश्वर तलावावर 70 हुन अधिक मूर्तीचं विसर्जन करण्यात आले आहे. अजून 25 हुन अधिक मूर्तीचं विसर्जन होणे बाकी आहे.ढोल पथकाच्या गजरात डी जे चया तालावर तरुणाई थिरकत फटाक्यांच्या आतषबाजीत गणेश विसर्जन सुरू आहे.
रविवारी सायंकाळी पाच वाजता शहरातील हुतात्मा चौकातून ही मिरवणूक सुरू झाली होती. सकाळी सातच्या दरम्यान कपिलेश्वर युवक मंडळाचा गणपती रामलिंग खिंड मध्ये तर शाहू नगर काकतीवेस आणि भांदुर गल्लीचे गणपती सम्राट अशोक चौकात होते.बापट गल्लीतील दोन्ही मंडळाची गणेश मूर्ती 8 वाजता कपालेश्वर उड्डाणपूल वर होती.
अनेक तणावाचे प्रसंग
रविवारी रात्री शेट्टी गल्लीत काही समाज कंटकांनी दगडफेक करून तणांव निर्माण केला होता त्या नंतर चव्हाट गल्लीतील एका युवकावर अज्ञातांनी हल्ला केला होता.जिल्हाधिकारी कॅंपौंड जवळ खडक गल्ली आणि चव्हाट गल्लीतील युवकात संघर्ष झाला होता या ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला होता असे असताना अनेक घटनातून गणेश विसर्जन मिरवणूक सोमवारी सकाळी सुरू आहे.विसर्जन तलावा वर गणेश भक्तांचो गर्दी झाली आहे.