वीरभद्रनगरात येथील मुख्य रस्त्यावर दगडफेक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालय. रात्री सव्वा आठ च्या दरम्यान मुख्य रस्त्यावर गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना तुफान दगडफेक करण्यात आली पाच कारची मोडतोड करण्यात आली आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी नगर येथील मुख्य मार्गावर गणेश मिरवणूक सुरू असताना अज्ञातांनी विद्युत वाहिन्या शॉर्ट करून करंट काढले मग त्या नंतर तुफान दगडफेक झाली या दगडफेकीत पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. वीरभद्र नगरच्या रस्त्यावर दगड आणि विटा पडल्या होत्या.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, डी सी पी अमरनाथ रेड्डी आणि ए सी पी एस एम नागराज यांनी धाव घेऊन तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी सांगितले की या भागातील पूर्ण स्थिती नियंत्रणात असून कुणीही अफवा वर विश्वास ठेवू नये.मात्र कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही.म्यान दगडफेक करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.भेंडी बाजार येथील पेंडाल वर दगडफेक झाल्यावर समाज कंटकांनी पुन्हा एकदा शहराला वेठीस धरले आहे.
आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी बोमनहळळी ,पोलीस आयुक्त डी सी राजप्पा, ए सी कविता योगप्पन्नावर आदी अधिकाऱ्यांनी शिवाजी नगर भागाला भेट देऊन पाहणी केली.या भागात वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून पोलीस बंदोबस्त देखील वाढवला आहे.