सर्व सार्वजनिक गणेश मूर्तीचं विसर्जन पोलिसां व्यतिरिक्त झालं पाहिजे तेच खरं बेळगाव शहर असेल.दिपावली मोहरम बकरी ईद किंवा गणपती ख्रिस्तमस असेल सर्वांनी मिळून साजरा करा असे आवाहन पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी केले.
शनिवारी रात्री नवी गल्ली शहापूर येथील वायूपुत्र सेना मंडळाच्या वतीने महा आरतीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आयोजित महा आरतीत सर्व धर्मियांचा सहभाग होता.
पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी सत्य नारायण पूजा स्वतः बसून केली याचा मला अभिमान वाटला सर्व धर्मियांनी एकत्रित रित्या केलेली पूजा पूर्ण बेळगाव शहराला आदर्शवत ठरली पाहिजे.पोलीस नसताना भय मुक्त वातावरणात ज्यावेळी सण साजरे होतील त्याच वेळी खऱ्या भारताचे निर्माण होईल असे ते म्हणाले.
यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव,पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी, बशीर मुल्ला हमीद बागलकोटी,मेहबूब सनदी खालिद बागवान, अल्ताफ वांगी ,नगरसेवक संजय शिंदे,रवी साळुंके,आदी मोठया संख्येने उपस्थित होते.