बेळगावात मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटीचा गाजावाजा करण्यात आला मात्र कृती शून्य आहे. त्यामुळे फक्त कागदी घोडे न नाचविता प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्याची गरज आहे. सुस्त आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना शहानपणा सांगणारा देखावा कंग्राली गल्ली येथील एका 18 वर्षीय तरुण ओमकार कंग्राळकर याने आपल्या घरगुती गणेशोत्सवात साकारला आहे.
स्मार्ट सिटी म्हणजे बेळगाव शहर एक आदर्श बेळगावचा एक नमुना आहे. मात्र या स्मार्ट सिटीत हवं तरी काय? याची सर्व माहिती कंग्राळ गल्ली येथील जीआयटी मध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणाने दाखविले आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र नको तेथे निधी वाया घालून होतकरू विद्यार्थी यांना वाईट दिवस आणण्याची लक्षणे दिसून येत आहेत.
बेळगाव स्मार्ट सिटी झाल्यास त्यामध्ये कोणते संदेश असतील तसेच पर्यावरण पूरक स्मार्ट सिटी कशी करता येईल यावर इंजिनियरिंग शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने भर दिला आहे. त्यामुळे जे प्रशासनाला माहिती नाही ते त्याने करून दाखवण्याचा प्रयत्न या देखाव्यातून सादर केला आहे.
बेळगाव शहराची वाढती रहदारीची समस्या लक्षात घेऊन त्याने ट्रॅफिक मॅनेजमेंटवर या देखाव्यावर भर दिला आहे. त्यामुळे त्या मुलाच्या स्मार्ट सिटीची पुढील बेळगाव पाहण्यासाठी भक्त गर्दी करत आहेत याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच्या या प्रोजेक्ट बद्दल प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे.