राष्ट्रपती येऊन गेले आणी गुळगुळीतीकरण थांबले आहे. रंगवलेल्या डीवायडरचा रंगही उडू लागला आहे. या डीवायडर लावण्यासाठी आणून ठेवलेली झाडे आणि रोपटीही बेवारस झाली आहेत तेंव्हा उभा रोपट्यांना कोणीतरी दत्तक घेईल का असे विचारावे लागत आहे.
राष्ट्रपती येणार म्हणून कळल्यावर लगेचच १० ते १५ दिवस काम करण्यात आले. आणि आता पुन्हा येरे माझ्या मागल्या असेच चित्र आहे.
राष्ट्रपती निघून गेल्यावर लगेच पुन्हा शहर भकास होऊ लागले आहे. हातात घेतलेली कामेही अर्धवट टाकून प्रशासकीय अधिकारी पुन्हा झोपी गेले आहेत. यामुळे ही रोपटी मरायला आली आहेत.
आम्ही वृक्षारोपणाला महत्व देतो असे दाखवून देण्यासाठी आणलेल्या अनेक रोपट्यांचे रोपणही केले गेले नाही हे दुर्दैव दिसून येते.