जिल्ह्यातील साखर कारखान्यांना थकीत बिले देण्याची सूचना करणे जिल्हाधिकारी एस झियाउल्ला यांना अडचणीचे ठरले आहे. पालक मंत्री नाराज झाल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आज बेळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी सूत्रे स्वीकारली आहेत.
साखर कारखान्यांना नोटीस पाठविलयाच्या कारणावरून जिल्हाधिकारी झियाउल्ला एस यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नवीन जिल्हाधिकारी म्हणून बोमनहळ्ळी यांची वर्णी लागली आहे. या राजकारणामुळे अधिकाराच्या नाट्य प्रयोगाला सुरुवात होणार आहे.
केवळ एक वर्षात जिल्हाधिकारी एस झियाउल्ला यांची बदली करण्यात आली. मागील वर्षांपूर्वी एस जियाउल्ला यांची निउक्ती करण्यात आली होती. मात्र साखर कारखाना यांना नोटीस दिल्यामुळे आता त्यांची बदली करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या जागी आलेले नवीन जिल्हाधिकारी गुरुवार म्हणजे आजपासूनच सेवा व पदभार सुरू करत आहेत .
मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना ऊस बिले मिळाली नाहीत त्यामुळे झियाउल्ला एस यांनी कारखानधारकाना शेतकऱ्यांची बिले दिली नाही. त्यामुळे नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या आणि त्यांच्या बदलीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सध्या नूतन जिल्हाधिकारी आले असून ते शेतकऱ्यांची बाजू घेणार की कारखानदारांची हा प्रश्न आहे.
जिल्हाधिकारी झियाउल्ला यांनी माझी बदली झाली म्हणून कोणी आंदोलन छेडु नये असे आवाहन केले.