नवी गल्ली शहापूर येथील हे मंडळ मागील २९ वर्षांपासून काम करत असून सामाजिक व विधायक कार्यावर भर दिला जात आहे. तीस वर्षात प्रवेश केल्याबद्दल पुढच्या वर्षी महाप्रसाद आयोजित करून गणेश भक्तांची सेवा करण्याचा मंडळाचा हेतू आहे.
या मंडळाचे अध्यक्ष तानाजी सुभाष शिंदे हे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते राबत असतात. या माध्यमातून प्रामुख्याने रक्तदान शिबिर आयोजित केले जाते व दरवर्षी ३५ जण भाग घेऊन रक्तदान करतात. याचबरोबरीने लहान मुलांसाठी स्पर्धा, कार्यक्रम,
महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम हे उपक्रम राबवून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ दिले जाते.
गणेशभक्तांना रात्रीच्या वेळी प्रसाद वाटप म्हणून पुलाव व इतर खाद्यपदार्थ वाटण्याची परंपरा या मंडळाने जपली आहे. गणेश दर्शन करणाऱ्या भाविकांना रात्री उशिरा खाण्यासाठी काय मिळत नाही म्हणून हा उपक्रम हे मंडळ राबविते.
या वर्षी श्री राम रूपातील आकर्षक मूर्ती असून मूर्तिकार जे जे पाटील यांनी ती बनवली आहे. या मंडळाला प्रत्येकवर्षी कमीत कमी दोन ते तीन बक्षिसे मिळतात कारण २०१२ पासून वैविध्यपूर्ण मूर्तींवर या मंडळाने भर दिला असून नवी गल्लीचा महाराज अशी ओळख निर्माण झाली आहे.
दरवर्षी अनाथाश्रम व माहेश्वरी अंधशाळेला आर्थिक मदत केली जाते. देणगी स्वरूपात जमणारी रक्कम व कार्यकर्ते जमवीत असलेली वैयक्तिक मदत जमवून ही मदत होते. दसऱ्याला शहापूर स्मशान भूमी व महादेव मंदिरची स्वच्छता केली जाते. या मंडळाची मूर्ती बघायला गर्दी होते दररोज मध्यरात्री पर्यंत गर्दी असते.
देखावे करून खर्च केला जात नाही तर सामाजिक काम करण्याकडे भर दिला जातो यंदा मंडळाने सामाजिक संदेश व सुविचार च्या माध्यमातून जागृती करीत आहेत. पाणी आडवा जिरवा , स्वच्छता राखा असे जागृती संदेश तसेच शेतकरी आत्महत्यावर भावनिक हाक देण्याचा प्रयत्न आहे.
बंदीस्थ मंडप न करता सर्व भक्तांना थेट प्रवेश दिला जातो. दरवर्षी त्रास होऊ नये व विशेषतः
वाहनांवरून येणाऱ्यांसाठी थांबावे लागू नये याची काळजी घेतली जाते.