अनगोळ येथील सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण केलेले गणेशोत्सव मंडळ म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव शिवनेरी युवक मंडळ रघुनाथ पेठ अनगोळ यांच्याकडे पाहिलं जातं. या मंडळाची स्थापना एका व्यायाम शाळेत झाली. रघुनाथ पेठ येथे तेली बंधु यांनी स्वताच्या मुलांच्यासाठी एक तालीम बांधून घेतली होती. त्यामुळे गल्लीतील व गावातील युवक याठिकाणी व्यायाम आणि कुस्ती शिकण्यासाठी येत असत. आणि इथुनच गल्लीत हनुमान जयंती गाडा मिरवणूक व गणेशोत्सव साजरा करण्याला सुरवात झाली.
रविवारी पेठ, टिळकवाडी व बेळगाव परिसरातील मंडळाची प्रेरणा घेऊन गणेश उत्सव साजरा करण्याचा विचार आला आणि पहिला शरद तालीम येथे गणपती बसवण्यात आला. शरीर कमवता कमवता धार्मिक आणि सांस्कृतिक जोड येथील युवकांनी अंगीकारली.
युवकांनी लेझीम पथक तयार केले. पेठेचा लेझीम मेळा म्हणजे एक आकर्षण असायचे यांचे खेळ बघण्यासाठी आसपासच्या खेड्यातून लोक यायचे. इतका आकर्षक खेळ खेळला जात असे. हा लेझीमचा खेळ बासरी वर खेळला जात असे त्यामुळे एक नवीन आकर्षण असायचे.आपल्या कार्याच्या जोरावर हे गणेश मंडळ बेळगावातील उत्कृष्ट विधायक गणेश मंडळ ठरलं आहे.
तालीम मधला उत्सव सार्वजनिक करण्याचा प्रयत्न युवकांनी केला आणि १९६५ साली परशराम मोनाप्पा चौगुले, श्री नारायण बाबले, कै. रामा सोमणाचे, कै बाबुराव कंग्राळकर, बाबुराव बेन्नाळकर(पाटील), कै सिध्दापा पाटील, कै. परशराम भावकाण्णा मुतगेकर, नारायण बाबले( गवळी) यांनी पुढाकार घेऊन हा उत्सव साजरा केला.
यावेळी एक साप्ताहिक बचत गटाची स्थापना करण्यात आली. आणि यातुन मिळालेल्या नफ्यातुन उत्सव साजरा केला जात असे. मंडळाचे अध्यक्ष मोनाप्पा चौगुले हे एक उत्कृष्ट रंगकर्मी आहेत ते या मंडळाचे पडदे स्वत रंगवण्याचे काम करायचे.. कांही वर्षानी गल्लीत एक पंच कमीटी ची स्थापना करण्यात आली.
यावेळी उत्सवानिमित्त गावात आणि गल्लीत नाटकांचे प्रयोग होऊ लागले. अनेक ऐतिहासिक नाटके या मंडळानी सादर केली आणी यासाठी नारायण बिर्जे यांनी विशेष परिश्रम घेत असत. नंतर रात्री चित्रपट ही दाखवण्यात येत असत..
यानंतर हा उत्सव नवीन पिढीच्या हाती आला आणि येथुन सर्व रंगच पालटला. आणि एका पेक्षा एक असे देखावे या मंडळाने करण्यास सुरुवात केली. पहीला युवकांनी एकत्र येऊन शिवनेरी युवक मंडळ रघुनाथ पेठ ची स्थापना केली आणि हा उत्सव आपल्या खांद्यावर घेतला. आणि विविध विषयांवर प्रबोधनात्मक देखावे, ऐतिहासिक, पौराणिक कथा या विषयावर देखावे करण्यास सुरुवात केली. मंडळाचे पहीले अध्यक्ष म्हणून शिवाजी मुतगेकर यांची निवड झाली, त्यानंतर दिगंबर शहापूरकर, शंकर बिर्जे, राजु मुतगेकर, बाळू बिर्जे, सदानंद यळ्ळूरकर, ह्या कार्यकर्त्यांनी मंडळाची धुरा सांभाळली,
महीला मंडळ ची स्थापना
जिजामाता महीला मंडळ रघुनाथ पेठ अनगोळ ची स्थापना करण्यात आली आणि महीलांना ही या सार्वजनिक कामात सहभाग करून घेतला गेला. मंडळाच्या वतीने आता पर्यंत ऐतिहासिक किल्ला, स्वराज्याची शपथ, थर्माकोलचे मंदिर, गोकाक फॉल्स, ऐतिहासिक टायटॅनिक बोट, राम सेतु, वृंदावन उद्यान, पौर्णिमा देखावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अश्या अनेक देखाव्यांचे परंपरा कायम ठेवली आहे मागितली वर्षी ऐतिहासिक सर्जीकल स्ट्राईक देखावा करण्यात आला. आणि यंदाही सामाजिक संदेश देणारा देखावा उभा करण्यात आला आहे सेल्फी मुळे होणारे दुष्परिणाम आणि सीमेवर होण्याऱ्या जवानांचे बलिदान यांच्यातला साधर्म्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे..
मंडळाच्या वतीने गल्लीत पाण्याची टाकी दर महिन्याला स्वच्छता मोहीम, मंदिर स्वच्छता, युवकांच्या साठी व्यायामशाळा, लहान मुलांसाठी स्पर्धा, वृध्द आश्रमांना मदत, मतिमंद मुलांच्या आश्रमाला मदत, गल्लीतील लहान मुलांना ऐतिहासिक किल्ले दर्शन, लाठी मेळा, झांजा पथक, शिवजयंती उत्सव, हनुमान जयंती, शिवजयंती वेळी शिवरायांच्या जीवनावर आधारित जिवंत देखाव्यांचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येतात.. तसेच गल्लीतील व गावातील धार्मिक कार्यक्रम किंवा गावातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात येत, अश्या विविध उपक्रमांची सांगड घालत हे मंडळ आपली सामाजिक बांधीलकी जपत आहे…