Tuesday, November 19, 2024

/

पं. मदन मोहन मालवीय चौक:सांस्कृतिक जपणूक करणारे गणेश मंडळ

 belgaum

१९६७ साली सुरू झालेल्या या मंडळाने मागील वर्षीच आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे.रवींद्र घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली या मंडळाचे काम सुरू आहे. खंजार गल्ली आणि परिसरात राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपला भाग मागासलेला नाही तर येथेही एकत्रित येऊन चांगली कामे करत येतात हेच या मंडळाच्या कार्यातून दाखऊन दिले आहे.
१९६७ मध्ये आता महादेव आरकेड असलेल्या जुन्या कलघटगी चाळीत या मंडळाची स्थापना झाली.पण काही आक्षेप होऊन पुढे शनिवार खुट येथे हे मंडळ चालू झाले. कै जायप्पा कुट्रे यांचे किराणा दुकान होते व ते आयुर्वेदिक औषधे देत असत. त्यातून येणार पैसा साठवून त्यांनी या मंडळाला मदत केली आहे. आपल्या कार्याच्या जोरावर हे गणेश मंडळ बेळगावातील उत्कृष्ट विधायक गणेश मंडळ ठरलं आहे.

Shaniwar khut ganesh mandal

अचानकपणे उद्भवणाऱ्या वाईट प्रसंगात मंडळाकडून शक्यतो आर्थिक मदत केली जाते. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता ५ हजार इतके आर्थिक सहाय्य केले जाते. गल्लीतील हिंदू पंच मंडळ, छत्रपती युवक मंडळ, प्रगती महिला मंडळ या सामाजिक कार्यात पूर्णपणे अग्रेसर असतात.
सामूहिक अथर्वशीर्ष पठण, देशसेवा करत असलेले जवान तसेच शहिद जवानांच्या पत्नींचा सन्मान, भजन कार्यक्रम, अंध व अपंग कलाकारांना वाव देण्यासाठी त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर, शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करणे यात मंडळ नेहमीच पुढाकार घेत आले आहे.
आत्महत्या व वाईट व्यसनापासून तरुण पिढीला दूर ठेवण्यासाठी डॉ सोनाली सरनोबत यांच्या सारख्या व्यक्तींचे व्याख्यान, सोंगी भारुड सारख्या पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन करून जुन्या गोष्टींची ओळख, अन्नदान आणि महाप्रसादाचे आयोजन करून सर्व धर्मियांना समावेशक गणेशोत्सव साजरा करण्याचे काम हे मंडळ करत आहे.
यापुढील काळातही सतत सामाजिक गरजांवर काम करत राहणार असल्याचे हे मंडळ आणि कार्यकर्ते बोलतात. त्यांनी अनेक आव्हानांवर मात करत धार्मिकता जपताना सामाजीकतेचाही विचार केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.