गणेश उत्सव आणि मोहरम दोन्ही समाज बांधवांनी आपापल्या परीने उत्साहात साजरा करा पण जो कुणी कायदा हातात घेईल त्याची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी दिला आहे.
बेळगावातील आर टी ओ जवळील पोलीस भवनात शांतता सभेत बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, महानिंग नंदगावी, सर्व पोलीस स्थानकाचे अधिकारी, मध्यवर्ती गणेश महा मंडळाचे पदाधिकारी,मुस्लिम समाजातील पंच आदी उपस्थित होते.
रविवारी झेंडा चौक गणेश मंडळा समोर महापौर उपमहापौरांनी गणेश आणि मोहरम ताबूत पूजन करून सौहार्दतेचा संदेश दिला आहे. गणेश आणि ताबुत आमोरा समोर बसले आहेत तेंव्हा दोन्ही समाजातील जनतेने बेळगावात सण गुण्यागोविंदाने साजरा करण्याची गरज व्यक्त केली.
पोलीस खात्याने गणेश उत्सव व्यतिरिक्त इतर सण मिरवणुकीवर देखील नियंत्रण आणावे गणेश उत्सवात गोंधळ घालणाऱ्या वर सक्त कारवाई करावी अशी मागणी केली.