आमचा मुलगा अभ्यास खूप करतोय पण पेपर लिहिताना त्याला आठवत नाही,आमची मुलगी अभ्यास करत असताना लक्ष केंद्रित करू शकत नाही,मुलगा नेहमी हट्ट करतोय,मुलगा सांगितलेले ऐकत नाही,मुलगा किंवा मुलगी इतरांशी मिसळत नाही,मुलाला सायन्सला घालावे की आर्टस्,कॉमर्स की आणखी कोठे ?मुलाला कोणत्या कॉलेजला घालायचे हे समजेना झाले आहे,त्याची आवड कोणती हे काहीच कळेना झालंय असे ऐकायला मिळते.पालक गोंधळलेले असतात.काय निर्णय घ्यावा याविषयी संभ्रमावस्थेत असतात.आता यावर एक विज्ञानावर आधारित एक उपाय उपलब्ध झालाय.तो म्हणजे डी एम आय टी टेस्टचा.या टेस्टमुळे मुलाचे किंवा एखाद्या व्यक्तीची गुण वैशिष्ट्ये,त्यांच्या आवडीचे क्षेत्र याविषयी माहिती मिळते.
डी एम आय टी टेस्ट म्हणजे नक्की काय आहे?ही टेस्ट म्हणजे नक्की काय आहे याची बऱ्याच जणांना माहिती नाही.बुद्धिमत्तेच्या एकूण नऊ कसोट्यावर आधारित ही टेस्ट म्हणजे वरदानच ठरली आहे .
या टेस्टमुळे मुलांच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावाची,अभ्यास करण्याच्या पद्धतीची,त्यांच्या गुण वैशिष्ट्यांची, त्यांच्या अंगभूत गुणांची,ते कोणत्या क्षेत्रात करिअर करू शकतात ,कोणत्या कलेत,खेळात प्राविण्य मिळवू शकतात ,कोणते क्षेत्र करिअर साठी निवडावे अशी माहिती मिळते.ही टेस्ट म्हणजे आज विशेष करून पालकांना त्यांच्या मुलांच्या करिअर विषयी,अभ्यासाच्या तक्रारीविषयी मार्गदर्शक ठरली आहे.
डरमॅटोग्लिफिक्स म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला फिंगरप्रिंट्सचा अभ्यास .मल्टीपल इंटेलिजन्स म्हणजे मेंदूच्या स्तरांचा ,मानसशास्त्राचा अभ्यास करून काढलेला निष्कर्ष.या टेस्टमध्ये मुलाच्या किंवा व्यक्तीच्या दोन्ही हातांच्या दहाही बोटांचे ठसे घेतले जातात.नंतर या बोटांच्या ठशांचे पृथकरण करून मेंदूच्या रचनेचा आणि मानसशास्त्रीय अभ्यास करून टेस्टचा रिपोर्ट तयार केला जातो.संपूर्णपणे विज्ञानावर आधारित ही टेस्ट आहे.या टेस्टमुळे अनेकांच्या जीवनाला कलाटणी मिळून आज आपल्या आयुष्यात ते यशस्वी झाले आहेत.
बऱ्याच वेळा मुलाचे अंगभूत गुण आणि आवड ही वेगळी असते पण पालक जबरदस्ती करून आपल्या इच्छेप्रमाणे त्याचे करिअर घडवायला बघतात.पण प्रत्यक्षात ते क्षेत्र मुलाच्या दृष्टीने योग्य नसते.त्यामुळे केवळ पालकांच्या अट्टाहासामुळे मुलाच्या शिक्षणात अडथळे यायला लागतात आणि समस्या सुरु होतात.पर्यायाने पालक आणि मूल या दोघांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.यामध्ये पालकांचा पैसा, वेळ वाया जातो शिवाय मुलाला इच्छेविरुद्ध आवड नसलेले शिकायला लागते .या साऱ्या बाबीमुळे कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडून जाते.निष्कारण कुटुंबातील सदस्य एकमेकांवर राग काढू लागतात.त्यामुळे मुले अधिक दडपणाखाली येतात.
प्रत्येक व्यक्ती किंवा मूल हे वैशिष्ट्यपूर्ण असते.त्याचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या मेंदूची रचना.मानवी मेंदू आणि बोटांचे ठसे याचा थेट संबंध असल्याचे शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झाले आहे.काही जल्मलेल्या मुलांना मेंदू नसल्याचे दिसून आले आहे.या मेंदू नसलेल्या मुलांच्या बोटांचे ठसेच नसल्याचे संशोधनातून आढळून आले आहे.त्यामुळे संशोधनातून हाताच्या बोटांचे ठसे आणि मेंदू यांचा थेट संबंध असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
डी एम आय टी ही एक वैज्ञानिक निकषावर आधारलेली टेस्ट असून मुलांच्या समस्या,त्यांचे करिअरचे क्षेत्र कोणते,अभ्यासात सुधारणा करण्यासाठी काय करायला पाहिजे .मुलाने सायन्स साईड घ्यायला पाहिजे की आर्टस्,कॉमर्स ?त्याला कोणत्या कलेत प्राविण्य मिळवता येईल ,तो डॉक्टर होईल का इंजिनियर ,मुलाच्या स्वभावात बदल होईल काय ?कोणत्या खेळात त्याने करिअर करावे ,तो गायक होईल काय ?तुमच्या मुलाचे प्लस आणि मायनस पॉईंट्स कोणते ,त्याला भेडसावणाऱ्या समस्या कशा सोडवायच्या या साऱ्या प्रश्नांची उत्तरे डी एम आय टी टेस्ट केल्यावर मिळतात . टेस्टचा रिपोर्ट पाहून तज्ञ कौन्सिलर पालक आणि मुलांना मार्गदर्शन करतात . त्यामुळे मुलांचे करिअर आणि त्यांच्या अभ्यासाच्या तक्रारी यावर सहज मार्ग काढणे आता शक्य झाले आहे . चार वर्षाच्या मुलापासून साठ वर्षाच्या व्यक्तीपर्यंत कोणीही आपली डी एम आय टी टेस्ट करून घेऊ शकतो . बऱ्याच जणांना काही काळाने नोकरी किंवा व्यवसायात बदल करावा असे वाटते . त्यांच्यासाठी सुद्धा ही टेस्ट जीवनाला कलाटणी देणारी ठरू शकते .