के एल एस संस्थेच्या हिरक महोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे बेळगावला आले.शनिवारी सकाळी 10:15 वाजता इंडियन एअर फोर्स च्या खास विमानाने सांबरा विमान तळावर आगमन झाले.
राज्यपाल वजुभाई वाला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिश्रा,मुख्य अटर्नि जनरल के के वेणूगोपाल, पालकमंत्री रमेश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेबाबळकर ,महापौर बसप्पा चिखलदिनी, उपमहापौर मधुश्री पूजारी प्रादेशिक आयुक्त पी ए मेघांनावर, जिल्हाधिकारी एस जिया उल्ला, पोलीस आयुक्त डी सी राजप्पा आदींनी स्वागत केलं.
एअर इंडियाच्या मार्गदर्शना नुसार बेळगाव दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना खास नाश्ता तयार करण्यात आला आहे.
बेळगावच्या आरोग्यअधिकाऱ्यांनी तयार कऱण्यात आलेल्या नाश्त्याचीव अन्य खाध्य पदार्थांची तपासणी केली यावेळी एस पी जी,एअर फोर्स अधिकारी व अन्य वरिष्ठ सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी ही तपासणी करून राष्ट्रपतींना नाश्ता सांबरा विमान तळावर दिला.
नाश्त्यात सलाद,बदाम हलवा,भात आमटी,पुलके, जिरा राईस, असा साधा बेळगाव पद्धतीचा आहार देण्यात आला.नाश्ता करून राष्ट्रपती कोविंद आणि त्यांची पत्नी मुख्य कार्यक्रमाकडे रवाना झाले.