Monday, January 20, 2025

/

‘मला वार्निंग देण्याचा प्रश्नच उदभवत नाही’-सतीश जारकीहोळी

 belgaum

जिल्ह्याच्या राजकारणात इतर जिल्ह्यातील नेत्यांनी सतत हस्तक्षेप केल्याने समस्या निर्माण झाली आहे पक्षातले वरिष्ठ नेते ही समस्या सोडवतील असा माझा विश्वास आहे. काँग्रेस पक्ष मोडून कोण बाहेर जात नाही आहे असे वक्तव्य माजी मंत्री आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

satish jaarkiholi

बेळगावात ते पत्रकारांशी बोलत होते.सध्या असलेली राजकीय अस्थिरता आणि मला काही एक संबंध नाही मी नाराज आहे मात्र मला हाय कमांडनी ताकीत देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.कोणत्या पक्षात नाराजी असत नाही सर्व पक्षातुन नाराजी असते बेळगावच्या विषयावर के पी सी सी अध्यक्ष दिनेश गुंडुराव यांच्या बरोबर दोनदा चर्चा झाली आहे असं ते म्हणाले.

जेष्ठ मंत्री डी के शिवकुमार आणि माझी भेट झाली नाही आमच्यात चर्चा देखील झाली नाही पक्षात अतृप्त लोकांनी जन्म घेतलाय मात्र त्यांचे नेतृत्व कोण करतंय याची मला जाणीव नाही असं देखील ते म्हणाले.

विकासाच्या दृष्टिकोनातून बेळगाव जिल्ह्याचं विभाजन झालं पाहिजे दोन दशका पासूनची ही मागणी असून मी स्वतः हा प्रस्ताव ठेवलाआहे अशी भूमिका त्यांनी मांडली. जिल्हा विभाजन करण्याची चर्चा समन्वय समितीत झाली पाहिजे. असेही त्यांनी नमूद केलं.

16 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राजकीय घडामोडीची मला जाणीव नाही मात्र मंत्रिमंडळ विस्तारात आमच्या समर्थकांना मंत्री पद मिळेल याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 belgaum

1 COMMENT

  1. Politics playing with voters we voted them to be unite,and for developing our city not to play games like this i love all jarkiholi brothers we kept hope on you sir please don’t break our trust and develops our city

    Love u all

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.