बेळगाव live एक वर्षात बेळगावच्या आवडीचे पोर्टल झाले आहे. आम्ही दिलेल्या प्रत्येक लेख, बातमी आणि special रिपोर्ट ला बेळगाववासीयांनी चांगला प्रतिसाद दिला.
आज गणेशाचे आगमन होत आहे आणि आम्ही घेऊन येत आहोत खास बेळगाव उत्तर आणि दक्षिण विभाग मर्यादित विधायक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा.
तुम्ही तुमचा सार्वजनिक उत्सव साजरा करताना कसे पूजन करता, कोणती विधायक कामे आजवर केली आहेत, देखाव्यातून सामाजिक संदेश दिला जातोय का…? या आणि इतर गोष्टींचे परीक्षण आमची खास परीक्षक टीम करेल.
आणि उत्कृष्ट उत्तर आणि दक्षिण विभागातील प्रत्येकी पाच मंडळांना दिले जाईल आकर्षक बक्षीस व बेळगाव live कडून आकर्षक ट्रॉफी सुद्धा.
तयारी करा, चांगला उत्सव साजरा करा, आम्ही परीक्षणाच्या तयारीत आहोत आणि तुमचा गौरव करणे हे आमचे कर्तव्यच आहे.
गणपती बाप्पा मोरया…..