गणपती बाप्पा हा सर्व भक्तांचा लाडका देव. आज त्याच्या येण्याचा दिवस . बेळगाव शहर आणि परिसरात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आणि भक्तांनीही त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

आज सकाळपासूनच बेळगाव शहर भक्तीच्या वातावरणात फुलून गेलेय. लाडके बाप्पा येणार याचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर जाणवत होता, बाप्पा आले आणि त्यांनी भाविकांच्या घरी आजपासून वास्तव्य केले.
नवीन कपडे घालून आणि वाजतगाजत बाप्पाचे स्वागत करण्यात आले आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडपात बाप्पा विराजमान झाले आहेत.
आता सलग दहा दिवस शहरात बाप्पांच्या भक्तीचा धावा होत राहणार आहे.


