बेळगावात पूर्ण कर्नाटक राज्यात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातो म्हणूनच बेळगावातील गणेश उत्सवाला वेगळा उत्साह परंपरा आहे.अकरा दिवसात आयुक्त कार्यालयाच्या व्याप्तीत 1044 सार्वजनिक गणेश मूर्तींची सथापना केली जाते या 68 मंडळ अति संवेदनशील,163 संवेदनशील,813 साधारण गणेश मंडळ आहेत. गुरुवारी पहिल्या दिवशी आगमम होऊन पाचव्या दिवशी 35,सातव्या दिवशी 26,नवव्या 10 आणि अकराव्या 971 गणेश मूर्तीचं विसर्जन होते.
मोहरम गणेश उत्सव काळात कोणीही कायदा हातात घेतल्यास सक्त कारवाई केली जाणार आहे.सर्व पोलीस स्थांनकातून शांतता सभांच आयोजन करण्यात आले आहे. महा पालिका आणि हेस्कॉम च्या वतीनं आवश्यक सेवा पुरवण्यात आली आहे अशी माहिती देखील पोलिस आयुक्तांनी पत्रकात दिली आहे.
पहिल्या टप्प्यात 1 पोलीस आयुक्त,2 उपायुक्त,3 ए सी पी,14 पी आय,26 पी एस आय,94 ए एस आय,847 हेड कॉन्स्टेबल,500 होम गार्ड,9 के एस आर पी,6 सी ए आर पथक सह 1 जलद कृती दलाची तुकडी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुख्य मिरवणूक मार्गावर सी सी टी व्ही बसवले असून पूर्ण मिरवणूक इन कॅमेरा होणार आहे. पूर्ण गणेश उत्सव काळात शहरात गस्त वाढवली असून 24 तास 19 चिता दुचाकी याशिवाय 18 रक्षक वाहनांची गस्त शहर भर असणार आहे. महिलांच्यासाठी विशेष दोन चनमम पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.पाचव्या आणि अकराव्या दिवसाला वेगळा बंदोबस्त असेल.