सोमवारी उद्या असणाऱ्या भारत बंद निमित्य बेळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजना सुट्टी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी आदेश बजावला आहे.
देशभरात पेट्रोल डिझेल दर वाढी विरोधात काँग्रेसने देश भरात भारत बंद चे आवाहन केले आहे देश भरातील सामान्य माणसाला होत असलेल्या त्रासामुळे भाजप सरकार विरोधात काँग्रेसने बंद चे आवाहन केले आहे.
सकाळी 6 ते सायंकाळी 4 पर्यंत होणाऱ्या या काँग्रेसच्या बंद ला राज्यातील जे डी एस ने देखील पाठिंबा दिला आहे.बेळगावात के एस आर टी सी कामगार संघटना,टेंपो टॅक्सी मॅक्सी कॅब असोसिएशन सह अन्य संघटनांनी देखील बंदला पाठिंबा दिला आहे.त्यामुळं बेळगावात देखील सोमवारचा बंद कडकडित होणार आहे.