गंगाराम सेवा ट्रष्ट 18 वर्षांपासून मंडळांच्या मूर्तींना मोफत प्लास्टिक देण्याचा विधायक उपक्रम जपला आहे असे उदगार मार्केट ए सी पी शंकर मारिहाळ यांनी काढले.
शहर आणि परिसरातील सार्वजनिक गणेश मूर्तींना प्लास्टिक वितरण ए सी पी शंकर मारिहाळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
नरगुंदकर भावे चौकात झालेल्या कार्यक्रमात मंडळांना प्लास्टिक वितरण सुरू करण्यात आले आहे.
गणेश मंडळांना प्लास्टिक व्यापारी रमेश पावले हे गेली 18 वर्षे सुमारे 400 मंडळांच्या सर्व गणेश मूर्तींना मोफत प्लास्टिक देण्याचे कार्य करतात त्यांच्या या कार्याचे कौतुक ए सी पी शंकर मारिहाळ यांनी केले.यावेळी महा मंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर,गंगाराम सेवा ट्रष्टचे रमेश पावले,उपाध्यक्ष रणजित चव्हाण पाटील,पी आर ओ विकास कलघटगी,सरचिटणीस शिवराज पाटील,सागर पाटील,मोतेश बारदेशकर आदी उपस्थित होते.
फुलबाग गल्ली, भारत नगर शहापूर,नवी गल्ली शहापूर येथील गणेश मंडळांना ए सी पी मारिहाळ यांनी प्लास्टिक वितरण केले.शहरातील गणेश मंडळांनी आपल्या मंडळाचा वार्षिक अहवाल दाखवून श्री मूर्तींना मोफत देण्यात येणारे प्लास्टिक घेऊन जावे असे आवाहन गणेश महामंडळाच्या वतीनं करण्यात आले आहे.