ड्रेनेज व्यवस्थेतील असंख्य समस्यांमुळे एसपीएम रोडच्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.घरा दारा समोर साचणारे ड्रेनेज नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. येथील नागरिकांना तात्काळ मदतीची गरज आहे.
कपिलेश्वर मंदिर भाग आणि गुडशेड रोड येथून येणाऱ्या ड्रेनेज लाईन एसपीएम रोड ला मिळतात. ड्रेनेज वाहण्याचे प्रमाण अधिक असल्याने ते बाहेर पडत आहे.यामुळे सांडपाणी परिसरातील विहिरीमध्ये जात आहे. तसेच नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. नागरिकांनी याबद्दल प्रशासनाला कळवले आहे पण आश्वासने देऊन त्यांना परत पाठवले जात आहे.
या प्रकाराने नागरिकांनी विहिरीचे पाणी वापरायचे थांबवले आहे. काहीवेळा सकिंग मशीन आणून हे पाणी काढले जाते पण कायमस्वरूपी उपाय केला जात नाही. ही मुख्य तक्रार आहे.
संपूर्ण ड्रेनेज लाईन नवीन घालणे हा एकमेव पर्याय आहे पण त्यासाठी नागरिकांना गणेशोत्सव होईपर्यंत थांबावे लागेल. ऐन सणात दुर्गंधीचा सामना करावा लागू नये याची दखल घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.