शहरातील गणेश मंडळा कडून परवानगीसाठी पोलीस प्रशासनाकडून घेतले जाणारे वीस रुपयांचा बॉण्ड आणि कार्यकर्त्यांचे फोटो घेतले जाणार नाहीत असे आश्वासन पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी दिले.
गणेश उत्सव मंडळांना विविध परवाने देताना पोलीस स्थानकातून वीस रुपयांचा बॉण्ड आणि अध्यक्ष सचिवांचे फोटो देण्याची अट घातली होती त्यामूळे बहुतेक गणेश मंडळानी मध्यवर्ती गणेश मंडळांना कल्पना दिली होती त्यानुसार महा मंडळ पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांना भेटून त्याची कल्पना दिली.
पोलीस आयुक्तांनी जर का महामंडळ याची जबाबदारी घेत असेल तर ही अट काढू असे म्हटल्यावर तात्काळ गणेश महा मंडळाने होकार दिला मग आयुक्तांनी संबंधित पोलीस स्थानकांच्या अधिकाऱ्यांना सदर अट काढून टाकण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी महामंडळ कार्याध्यक्ष रमाकांत कोंडूसकर, सचिव शिवराज पाटील,उपाध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सागर पाटील,गणेश दड्डीकर शहापूर गणेश महा मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव,अशोक चिंडक,बाळा साहेब काकतकर, राजेंद्र हंडे आदी उपस्थित होते.
अगोदर धेतलेत त्यांचं काय….. मुळात
द्येतलेच का