Thursday, December 19, 2024

/

तरच… ‘एक नोव्हेंबरपूर्वी ब्रिजचे काम पूर्ण’

 belgaum

गोगटे सर्कल उड्डाण पुलाचे काम 31 ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करा अशी नवी डेड लाईन खासदार सुरेश अंगडी यांनी दिला आहे.

शुक्रवारी कॅन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष साजिद शेख,पालिका अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर यांच्यासह खासदार अंगडी यांनी गोगटे सर्कल जवळील ब्रिजच्या कामाची पहाणी केली.

Rob visit

सध्या शहरात सगळीकडे ट्रॅफिक जाम होत आहेत अश्यात तिसरा रेल्वे गेट आणि इतर उड्डाण पुलांची देखील कामे सुरू करायची आहेत त्यामुळं गोगटे सर्कल ब्रिज काम त्वरित करा अश्या सूचना रेल्वे अधिकारी आणि ठेकेदाराला दिले आहे.

सध्या या कामी दिवस रात्र अनेक कामगार लागलेत काम युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र पाऊस बंद झाला तरच 31 ऑक्टोबर पूर्वी रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्ण होईल अशी माहिती दिली पावसात बार बिल्डिंग वेल्डिंग काम बंद असते त्यामुळे उशीर होत आहे असे ठेकेदाराने सांगितले आहे त्यामुळं हे उड्डाण पूल वाहतुकीसाठी सुरू व्हायला आणखी अवधी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.