बेळगाव यशवंतपूर दरम्यान गणेश चतुर्थी निमित्य फेस्टिव्हल विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय दक्षिण पश्चिम रेल्वेने घेतला आहे.सिटीझन कौन्सिलच्या वतीनं सदर रेल्वे सेवा सुरू करा अशी मागणी करण्यात आली होती त्याची पूर्तता दक्षिण पाश्चिम रेल्वेने केली आहे.
दरवर्षी गणेश उत्सवा निमित्य बेळगाव हुन बंगळुरूला येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते त्यामुळे असलेल्या सर्व रेल्वे गाड्या आणि बसेस फुल्ल झाल्या आहेत खाजगी बस कंपन्याकडून एकट्याला 2300रु प्रमाणे असे अवाढव्य तिकीट आकारले जात आहे अश्यात रेल्वे खात्याने सोडलेली तात्काळ गाडी दिलासा देणारी आहे.
बंगळुरू(यशवंतपुर)ते बेळगाव क्रमांक 06581 ही गाडी बुधवारी 12 सप्टेंबर रोजी रात्री 8:40 मिनिटांनी यशवंतपूर स्टेशन मधून सुटणार आहे तर गुरुवारी 13 सप्टेंबर रोजी सकाळी 8:10 वाजता बेळगावला पोचणार आहे.
रेल्वे क्रमांक 06582 बेळगाव ते यशवंतपूर ही रेल्वे रविवार 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 :20 वाजता बेळगाव हुन सुटणार असून सोमवारी 17 सप्टेंबर रोजी पहाटे 5:00 वाजता यशवंतपुरला पोचणार आहे.
सदर गाडी 20डब्यांची असून त्यात दोन डबे ac-3 ,16 स्लीपर क्लास तर 2 लगेजचे डबे असणार आहेत.