भाजपचं राजकारण जमेना आणि समितीत काय चालेना आणि काँट्रॅक्टही पूर्ण होईना अशी अवस्था आज माजी महापौर शिवाजी सुंठकर यांची झाली आहे.
सतीश जारकीहोळी यांच्या सांगण्यावरून लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात कॉन्ट्रॅक्ट घेतलेले सुंठकर यांची परिस्थिती दयनीय झाली आहे.
शिवाजी सुंठकर हे सध्या समिती मधून बाहेर पडून भाजपचे सदस्य आहेत. पण भाजपच्या राजकारणात तेवढं स्थान मिळेना झालंय. ज्या रात्री तहसीलदार कार्यालया समोर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आंदोलन केलं होतं त्याच दिवशी सुंठकर यांनी देखील लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात आंदोलन केले पण त्यांनी घेतलेले कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होऊ शकले नाही.
सध्या काँग्रेस मध्ये पी एल डी वरून चाललेला घमाशांन थांबलं लक्ष्मी आणि सतिश यांच्यात पक्ष श्रेष्ठीनी समजोता घडवून आणलाय मात्र मात्र पक्ष भेद विसरून आंदोलन करायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेले माजी महापौर तोंडघशी पडलेत.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अट घातली होती की माध्यमांसमोर तमाशा करू नका मात्र सतीश समर्थक आणि अक्का समर्थक दोघांनीही आंदोलनं केली होती.समितीला जय महाराष्ट्र करत विथ द डिफ्रँस मध्ये गेलेल्या माजी महापौरांनी आपल्या पक्षात ग्रामीण मतदार संघात संघटना बळकट करणे,पक्षाची कामे करणे असले सोडून अक्का आणि सावकाराच्या भांडणात आंदोलन केले होते मात्र यात ते टीकेचे धनी होत आहेत त्यामुळे त्यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टची चर्चा अधिक होताना दिसत आहे.
जसे हेकेखोर हेब्बाळकरांच्या दावणीला बांधले गेले तसे बंडखोर सतीश जारकीहोळी यांच्या दावणीला बांधले गेलेत अश्यात समितीने निर्माण केलेली नेतृत्वे हाळ होत असून परकीयांचा फायदा होत आहे.