लक्ष्मी हेब्बाळकर आणि जारकीहोळी ब्रदर्स यांच्या वादात सरकार अडचणीत येऊ नये म्हणून कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री ईश्वर खांडरे बेळगावला आले आहेत. निर्माण झालेला वाद निवडणुकीपूर्वी मिटवून सरकार वाचवण्याचे काम त्यांच्याकडे आहे.
आज सकाळी सर्वप्रथम खांडरे हे कुवेंपु नगर येथील लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांनी त्या ९ सदस्यांनाही बोलावून घेतले. ५ जण समितीचे आणि ४ जण काँग्रेसचे असे मिळून असलेल्या या गटाशी त्यांनी चर्चा चालवली आहे. अजूनही ही चर्चा सुरू आहे कारण आपल्या मतावर लक्ष्मी आक्का अडून बसल्या आहेत.
ही चर्चा संपवून ते जारकीहोळी ब्रदर्स ची भेट घेणार असून उर्वरित ५ सदस्यीय गटाशी बोलणार आहेत.समझोत्यासाठी त्यांनी एक मोठे सूत्र आणले असून ते काय आहे यावरून पीएलडी बँकेचे राजकारण ठरणार आहे.
ईश्वर खांडरे हे कर्नाटक काँग्रेस मधील समझोता मास्टर म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वीही मोठे मोठे वाद आणि पेच मिटवले असून ते हा वाद मिटवून सरकार कसे वाचवतात हे बघावे लागेल.
मराठा समाजाला अध्यक्ष तर लिंगायत समाजाला उपाध्यक्ष स्थान देऊन निवडणूक बिन विरोध करण्याचे प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे.५ मराठी भाषिक सदस्य कुणाला मतदान करतात याकडे देखील साऱ्या मराठी जनतेचं लक्ष लागून राहिलंय त्यामुळं पी एल डी बँकेच्या निवडणुकीला महत्व प्राप्त झालंय