Sunday, January 5, 2025

/

‘९ विरुद्ध ५ फैसला आज’

 belgaum

पीएलडी बँकेवर हुकूमत कुणाची? ९ विरुद्ध ५ चे काय होणार? पहिल्यांदाच आमदार झालेल्या लक्ष्मी आक्का वजनदार ठरणार? की काँग्रेस वरिष्ठांच्या संगनमताने समझोता होणार? या साऱ्या गोष्टींकडे आज फक्त बेळगाव तालुका आणि जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

फैसला काय होणार आणि जारकीहोळी ब्रदर्स चा फैसला काय असेल याची चिंता आणि हुरहूर कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यापासून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत लागली आहे.

Pld bank

मागील ८ ते १५ दिवसांपासून हे प्रकरण गाजत आहे. एकूण १४ सदस्यांपैकी ९ सदस्य लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बांधून घेतले तर पाचच सदस्य सतीश जारकीहोळी यांच्याकडे राहिले. त्या ९ जणांपैकी एक दोघांची पळवापळवी करण्याचा प्रयत्न झाला आणि प्रकरण पेटले. लक्ष्मी आक्का पदर खोचून या रणात उतरल्या आणि जारकीहोळीनीही शड्डू ठोकला. आपले वजन वापरून निवडणूक पुढे ढकलली पण लक्ष्मी आंदोलन करून अडून बसल्या. अखेर उच्च न्यायालयात दाद मागून त्यांनी आजची तारीख निश्चित करून आणली आहे.
जारकीहोळी ब्रदर्स ना ही गोष्ट रचलेली नाही. कानामागून आली आणि तिखट झाली अशी प्रतिक्रिया देऊन लक्ष्मी गटाचा विजय झाला तर आम्ही काय करायचे ते बघून घेऊ अशी धमकीच दिली आहे. या धमकीने सरकार हादरले आहे. जारकीहोळी यांच्या बाजूने १० ते १२ आमदार आहेत. त्या समूहाने जर जेडीएस काँग्रेस युती सरकारचा पाठींबा काढून घेतला तर कुमारस्वामी यांचे सिंहासन हलणार आहे. भाजपला पण हेच पाहिजे आहे. भाजप या पैकी पाच जणांच्या पाठींब्यावर आपले सरकार स्थापन करू शकते. किंव्हा पुन्हा निवडणुकीचा धोका आहेच.
आजची निवडणूक काय होणार याकडे राज्याचे लक्ष आहे आपणही लक्ष ठेऊन राहूया बेळगाव live च्या माध्यमातून…

Pld bank

महाद्वार रोड येथे वाढला बंदोबस्त

पी एल डी बँकेचे कार्यालय महाद्वार रोड येथे आहे या बँकेच्या कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.या बँकेच्या 200 मीटर परिसरात 144 कलम लागू करण्यात आला आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.