तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी एस के पाटील यांनी स्वतः च आपली बदली करून घेतल्याची माहिती मिळाली आहे. याला कारण काय असेल तत्कालीन कार्यकारी अधिकारी ए आर हलसोडे याच्या बदलीनंतर केवळ ८ महिन्यात पाटील यांनी आपली बदली करू घेतली आहे. काहींच्या साटेलोटे चा फटका सहन न झाल्याने व चोर शिरजोर ठरत असल्यामुळे ही बदली करून घेतल्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे.
हलसोडे यांच्या बदलीनंतर एस के पाटील यांना या पदावर आणण्यासाठी तालुका पंचायत मधील काही सदस्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यामुळे आक्काच्या मेहरबानी वरही बदली करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र ज्यांनी ही बदली करून आणली त्यांचाच त्रास डोकेदुखी ठरु लागला. त्यामुळे ही बदली करून घेण्यासाठी मागील महिनाभरापासून त्यांचे प्रयत्न सुरू होते.
बुधवारी त्यांच्या बदलीचा आदेश आला आणि हप्तेखोरांची त्यांची बदली रोखण्यासाठी पळापळ सुरू झाली. सुरुवातीला पाटील हे ज्या तोऱ्यात आलेले होते केवळ ५ महिन्यात त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. ठिकठिकाणी द्याव्या लागणाऱ्या हप्त्यामुळे त्यांची चांगलीच पंचायत होऊन बसली होती. धरलं तर चावताय आणि सोडलं तर पळतय अशी गत पाटील यांची होऊन बसली. त्यामुळे त्यांनी आपली बदली करून घेण्यातच भले असल्याचे समजून ही बदली करू घेतली आहे, अशी माहिती मिळाली आहे.
ही बदली रोखण्यासाठी काही नेतेमंडळींना सांगू असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी स्वतः च ही बदली करून घेतल्यामुळे ते प्रयत्न ही फोल ठरले आहेत. या पदाचा पदभार कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. एस के पाटील यांची बदली सध्या चिकोडी येथे कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे. बेळगाव तालुका पंचायतीचा कार्यभार प्रभारी म्हणून मल्लिकार्जुन कलादगी यांच्या कडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.