रुक्मिणी नगर जवळील गणेश पेंडाल शेजारी असलेल्या टी सी वरील विद्युत भारित तारांचा स्पर्श होऊन एक जण दगावला असल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे.
द#
मोहन रामा भडगावे वय 40 रा.रुक्मिणी नगर बेळगाव असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुक्मिणी नगर मधील गणेश मंडळाच्या पेंडालच्या मागच्या बाजूला असलेल्या टी जवळ शिडी घेऊन गेला असता टी सी जवळ असलेल्या विद्युत भारित तारांचा स्पर्श होऊन करंट लागल्याने मोहन हा जागीच ठार झाला.
मयत मोहन हा हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा बळी असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.हेस्कॉम अधिकारी आणि उत्तर आमदार अनिल बेनके यांनी घटनास्थळी पहाणी केली