इंडोनेशिया येथील जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्स मध्ये कुराश या खेळात ब्रॉंझ मेडल मिळवलेल्या बेळगावची कन्या मलप्रभा जाधव हिला हळूहळू बक्षिसे मिळू लागली आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आठ लाखांचे बक्षीस जाहीर केल्यानंतर केंद्रीय खेळ मंत्रालयाने दहा लाखांचे बक्षीस दिले आहे.
मंगळवारी सायंकाळी दिल्ली येथील अशोक हॉटेल मध्ये झालेल्या कार्यक्रमात खेळ मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सत्कार करत दहा लाखांचे पारितोषिक दिले.एशियन गेम्स मध्ये एकूण 69 मेडल जिंकलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.खेळ मंत्री राज्य वर्धन सिंह राठोड हे एशियन गेम्स मध्ये खेळाडूंचे प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः हजर होते त्यांनी बेळगावची कन्या मलप्रभा जाधवचा सामना पाहण्यासाठी स्वतः हजर होते.
उद्या बुधवारी सायंकाळी पंतप्रधान कार्यालयात दुपारचे भोजन आयोजित केले असून पदक जिंकलेल्या खेळाडूंना यासाठी पंतप्रधान मोदींनी आमंत्रित केले आहे.एशियन गेम्स च्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने 69 मेडल जिंकली आहेत.
भारतीय कुराश संघटना इंडियन ऑलम्पिक संघटनेशी संलग्न नसून स्वखर्चानी विदेशी ट्रेनिंग घेऊन पहिल्यांदा कांस्य पदक जिंकून दिल्याने या पदकास विशेष महत्व आहे.