इस्कॉन तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवास आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवास रविवारी उत्साहाने प्रारंभ झाला या महोत्सवानिमित्त रविवारी दुपारी साडेचार ते 9 अभिषेक कीर्तन भजन आणि त्यानंतर प्रवचन झाले. महाप्रसादानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.
*मुख्य कार्यक्रम सोमवारी* जन्माष्टमीचा मुख्य कार्यक्रम सोमवारी पहाटेपासून सकाळ नऊ वाजेपर्यंत मंगल आरती, तुळशी आरती ,जप,गुरूपूजा आणि कृष्णकथा होईल सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दिवसभर भजन ,कीर्तन होईल सायंकाळी 5 ते 9 आरती अभिषेक ,रात्री नऊ वाजता नाट्य दिला आणि साडेदहा वाजता श्रीकृष्ण जन्मावर विशेष कथाकथन होईल. मध्यरात्री 12 वाजता जन्माष्टमीचा सोहळा आरतीने संपन्न होईल त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद होईल
*मंगळवारी संस्थापक श्रील प्रभूपाद यांचा जन्मदिन* हा व्यासपूजा म्हणून इस्कॉन मध्ये साजरा केला जातो. मंगळवार दिनांक 4 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पुष्पांजली ,आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होईल या सर्व कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे हे सर्व कार्यक्रम शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात होत आहेत