मेरा जुता है जापानी, ये पतलून इंग्लिस्थानी, सरपे लाल टोपी रुसी, फिरभी दिल है हिंदुस्थानी… असे म्हणणारे अनेकजण आम्ही सारेकाही फॉरेनचे वापरतो असे सांगत असतात. आम्ही कोट इंग्लडचा वापरतो आणि टाय घ्यायला अमेरिकेत जातो असा रुबाब करणारे कमी नाहीत पण काही विदेशी लोक आहेत ज्यांना भारतीय वस्तूंची भुरळ पडलेली असते. अशीच काही विदेशी माणसे कोट आणि सूट शिवून घ्यायला गेली अनेक वर्षे न चुकता बेळगावला येतात. बेळगावचे टेलर आणि टेलरिंग फर्म च्या ते प्रेमातच पडले आहेत. आहे की नाही विशेष बातमी?
खडेबाजार बेळगाव येथील लोखंडे कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या एस के काकडे टेलर्स यांच्या प्रेमात ही विदेशी माणसे पडली आहेत.आजसुद्धा ही विदेशी पाहुणे मंडळी बेळगावला आली होती. आपल्या मनासारखे माप देऊन कपड्यांची ऑर्डर देऊन ते गेले आहेत. विदेशात कपडे घेणाऱ्यांना हे नवल वाटेल पण लोक बेळगावच्या टेलरच्या दर्जेदार कामाने विदेशातून त्यांना इथे खेचून घेतले आहे.
हे फर्म बेळगावला १९४३ पासून आहे. या दिवाळीला ७५ वर्षे पूर्ण होतात. इंग्लंड मधून रॉबर्ट, ईझाक आणि फ्रांस मधून क्लिंटन अशी त्या पाहुण्यांची नावे आहेत. मागील पाच ते सहा वर्षे झाले ते नियमित येतात.कोट ,पॅन्ट, आणि शर्ट ते शिवून घेतात. ते पहिल्यांदा आले होते तेंव्हा काकडेंनी कपड्यासह २४०० रुपये घेतले होते तर आता कपड्यासह ४००० रुपये दर झाला आहे. पण पैसे महत्वाचे नाहीत तर कपडे अंगात योग्यरीत्या बसले पाहिजेत म्हणून ते येतात.
पहिल्यांदा त्यांनी वाय सी देशपांडे कापड दुकानात कपडे घेतले होते. त्यांना चांगले टेलर्स सांगा म्हणून विचारले होते.काकडे आणि देशपांडे यांचे संबंध जुने आहेत. काकडे त्यांची बरीच वर्षे टेलरिंग ची कामे करून देतात मोठं मोठ्या ऑर्डरी करून देतात
फॉरेन ची गिर्हाईके आली म्हणून त्यांनी लवकर आणि चांगलं काम करून दे असे सांगितले होते
तेंव्हा सकाळी माप घेऊन काकडेंनी संध्याकाळी शिवून दिले होते. कारण ते संध्याकाळी जाणार होते. ते इतके खुश झाले की त्यांनी ५०० रुपये जादा टीप देऊ केली होती पण घेतली नाही, त्यानंतर त्यांनी लंडन ला जाऊन फोटो पाठवले.आता येताना कळवून येतात.
या विदेशी व्यक्ती टेंडर हार्ट म्हणून गोवा इथे संस्था चालवतात. बेळगावला आले की नक्की येतात.कुंदा घेऊन जातात.
इंग्लंड मध्ये त्यांनी २ सूट घेतले होते त्याची भारतीय रुपयात ४५००० किंमत होते. ते सूट
जाड होतात. अंगावर वजन होते
पण इथले योग्य होतात म्हणून ते इथे आले आहेत. त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे.त्यांचा जावई तिथे मंत्री आहे त्याचेसुद्धा कपडे इथेच शिवून देणार आहेत. अशी माहिती काकडे टेलर्सनी दिली.
ही गोष्ट बेळगावच्या दृष्टीने अभिमानाची म्हणून सर्वप्रथम बेळगाव live वर देताना आनंद होतोय.